नवी मुंबई: नेरुळ च्या तलावात अवतरले मोठ्या संख्येने स्थलांतरीत पक्षी, पाहा मनमोहक दृश्य, See Pics
Migratory Birds (Photo Credits: ANI/Twitter)

मुंबईत स्थलांतरित पक्ष्यांचा कळप पाहायला मिळणे म्हणजे जणू भाग्यच! हे अद्भूत दृश्य पाहायला मिळणे दुर्मिळ आहे. अशातच आता नवी मुंबईच्या (Navi Mumbai) नेरुळ (Nerul) भागात स्थलांतरित पक्ष्यांचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळत आहे. नेरुळच्या तलावात मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये हे स्थलांतरित पक्षी ठाण्याच्या खाडीजवळ दिसले होते. महिन्याभरापूर्वी नेरूळच्या तलावामध्ये परदेशी पाहुणे फ्लेमिंगोचे दर्शन झाले होते. आज आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांना पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

दरवर्षी सर्वसाधारणपणे थंडीच्या दिवसात स्थलांतरित पक्ष्यांचे नवी मुंबईत तलाव, खाडीत आगमन होते. यंदा बर्ड फ्लूमुळे या पक्ष्यांचे आगमन थोडे उशिरानेच झाले आहे.हेदेखील वाचा- Rajasthan Bird Flu: कवाळ्यानंतर आता स्थलांतरित पक्षांचा सुद्धा बर्ड फ्लू मुळे मृत्यू होत असल्याने खळबळ

पाहा फोटोज

ज्या ठिकाणी शुद्ध पाणी असते व पाण्याची पी.एच.लेव्हल संतुलित असतो तेथेच फ्लेमिंगो आढळून येतात. ठाणे व वाशी परिसरात गेले कित्येक वर्षे फ्लेमिंगोचे आगमन होत असल्याने, ठाणे आणि वाशीच्या खाडीपट्ट्यात 1,690 हेक्टरचे फ्लेमिंगो अभयारण्य तयार करण्यात आले आहे. इथे असलेले विशिष्ट प्रकारचे शेवाळ, कोळंबी हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. नवी मुंबईच्या खाडीकिनारी शेवाळ, लहान मासे, खेकडे, झिंगा आदी मुबलक खाद्य मिळत असल्याने फ्लेमिंगोची पसंती या भागात जास्त आहे. सध्या फ्लेमिंगो पक्षांचे दर्शन हा मुंबईकरांसाठी पर्यटनाचा भाग झाला असून, त्यासाठी ठाणे व वाशी परिसरात मोठी गर्दी होत आहे.