Coronavirus: पुण्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह; नागरिकांना दिलासा

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 450 हून अधिक झाली आहे. तसेच महाराष्ट्रात 97 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातचं नागरिकांना दिलासा देणारी बातमी आमच्या हाती आली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या कोरोना बाधित दाम्पत्याची टेस्ट आज निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात आऊटलुक या इंग्रजी वेबसाईटने वृत्त प्रकाशिक केलं आहे.

Deadly Coronavirus (Photo Credits: IANS)

Coronavirus: देशात कोरोना व्हायरसमुळे मोठं संकट उभं ठाकलं आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 450 हून अधिक झाली आहे. तसेच महाराष्ट्रात 97 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातचं नागरिकांना दिलासा देणारी बातमी आमच्या हाती आली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या कोरोना बाधित दाम्पत्याची टेस्ट आज निगेटिव्ह (Negative) आली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात आऊटलुक या इंग्रजी वेबसाईटने वृत्त प्रकाशिक केलं आहे.

दरम्यान, या दाम्पत्याची मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करता येणार आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या चाचण्या करून या दाम्पत्याला घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना बरा होऊ शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील एका कोरोनाग्रस्त महिलेची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. (हेही वाचा - कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी गौतम गंभीर यांचा मदतीचा हात; खासदार निधीतून दिल्लीतील सरकारी रुग्णालयास देणार 50 लाख रुपयांचा निधी)

महाराष्ट्रात पहिल्यांदा या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. या दाम्पत्याच्या संसर्गामुळे त्यांच्या मुलीला आणि कॅब चालकालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. सुदैवाने आज या दाम्पत्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. परंतु, या दाम्पत्याच्या मुलीवर आणि कॅब चालकावर अद्याप उपचार सुरू आहेत.

देशात तसेच राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी काही रुग्ण मात्र ठणठणीत झाले आहेत. आतापर्यंत देशभरात 24 कोरोनाग्रस्तांची प्रकृती बरी झाली आहे. सध्या राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.