Coronavirus: सांगली येथील मिरज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका 94 वर्षीय वृद्ध महिलेची कोरोनावर मात

भारतात कोरोना विषाणूने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. यामुळे राज्यात सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरज रुग्णालयात (Miraj Hospital) उपचार घेणाऱ्या एका 94 वर्षीय वृद्ध महिलेने कोरोनावर मात (94 year old woman was discharged) केली आहे. यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांसह सर्व कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला ताळ्यांच्या गजरात निरोप दिला आहे. सध्या त्यांना इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन वार्डमध्ये हलवण्यात आले आहे. यामुळे कोरोना विषाणूचे सर्वाधिक धोका 80 वयागटावरील लोकांना आहे, अशा चर्चांना तात्पूर्ता पूर्णविराम मिळाला आहे.

कोरोना नियंत्रित कक्षाचे अधिकारी संजय सालुंखे यांनी दिलेल्या माहिती नुसार, कोरोनामुक्त झालेली 94 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच या महिलेला देखरेखसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. एका कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कात आल्याने वृद्ध महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता, असेही त्यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: नाशिक शहरातील 759 पैकी 459 रुग्ण कोरोनामुक्त!

एएनआयचे ट्वीट-

देशभरात कोरोना विषाणूचे जाळे अधिक वाढल चालले असल्याचे चिन्ह दिसू लागली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात 17 मेपर्यंत लॉकडाउन घोषीत करण्यात आले आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचेही संकेत दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाउन घोषीत करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच हे लॉकडाउन मुंबई आणि हॉटस्पॉट असलेल्या परिसरात लागू करण्यात येईल, असेही बोलले जात आहे.