COVID19: पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ; दिवसभरात 937 नव्या रुग्णांची नोंद; 14 जणांचा मृत्यू
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) हाहाकार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत मुंबईनंतर पुणे (Pune) जिल्ह्याचा क्रमांक लागत आहे. पुण्यात आज दिवसभरात 937 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 19 हजार 42 वर पोहचला आहे. यापैकी 676 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 हजार 671 रुग्णांनी कोरोनावर मात केली आह, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- नागपूर: सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर दांपत्याविरूद्ध बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

महाराष्ट्रात आज तब्बल 6 हजार 330 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 86 हजार 626 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 178 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 1 हजार 172 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याचबरोबर राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे राज्यातील नागरिकामध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.