Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 910 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,20,165 वर
Coronavirus (Photo Credits: PTI)

राज्याची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 910 रुग्णांची व 57 मृत्यूंची नोंद झाली. यासह शहरातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,20,165 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे 988 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत शहरात 92,661 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 20,562 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजच्या 57 मृत्युंसह मुंबईमध्ये 6,645 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली आहे. आज मृत्यू झालेल्या 41 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते.

यातील 37 रुग्ण पुरुष व 20 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. 30 जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 25 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 77 टक्के झाला आहे 30 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.87 टक्के राहिला आहे. 5 ऑगस्ट 2020 पर्यंत शहरात झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 5,74,919 इतक्या आहेत. यासह मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 80 दिवस झाला आहे. (हेही वाचा: राज्यात आज दिवसभरात कोरोना संक्रमित 11,514 रुग्णांची नोंद, 316 जणांचा मृत्यू)

एएनआय ट्वीट -

 

मुंबईमधील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 5 ऑगस्ट नुसार सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 619  आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारती 5661 आहेत. आज मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 8 रुग्ण आढळल्याने आकडा 2579 वर पोहचला आहे. याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. धारावीत कोरोनाचे सध्या 82 अॅक्टिव्ह रुग्ण आढळले असून 2257 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे.