SSC & HSC Attendance Compulsory: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य; पुढील वर्षापासून लागू  होणार नियम
Representational Image. (Photo Credits: PTI)

SSC & HSC Attendance Compulsory: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य (Attendance Compulsory) असणार आहे. पुढील वर्षापासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम नव्हता. मात्र, आता मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना आदेश देण्यात आले आहेत.

शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाचं प्रवेशपत्रे दिली जातील. त्यामुळे शाळा चुकावणाऱ्या विद्यार्थांना आता या आदेशाचा चांगलाचं फटका बसणार आहे. (हेही वाचा - Bye Election 2022: अंधेरी पूर्वसह देशभरात 7 राज्यांमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्षांचा सामना)

तथापी, यापूर्वी सीबीएसईकडून विद्यार्थ्यांची उपस्थितीबाबत निर्णय घेतला होता. सीबीएसई अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. सीबीएसईने देशभरातील शाळांना 18 जुलैला परिपत्रक पाठवून विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असण्याबाबच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याच्या सूचना देताना शिक्षण विभागाने संबंधित शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थिती संदर्भात शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या सदर बाब निदर्शनास आणून द्यावी, असे निर्देश दिले आहेत.