Kolhapur Ganpati Visarjan: गणपती विसर्जन मिरवणूकीतील लेझर शोमुळे 65 हून अधिक लोकांच्या डोळ्याला इजा
File image of devotees immersing the Ganesha idol | (Photo Credits: PTI)

गेले 2 वर्ष राज्यभरात (Maharashtra) गणेशोत्सव (Ganeshotsav) कोरोनाच्या (Corona) पार्श्वभुमिवर अगदी शांततेत पार पडला. पण यावर्षी कुठलेही निर्बंध नसल्याने गणेशोत्सवाचे 10 दिवस अगदी धुमधडाक्यात पार पडले. अगदी बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जन मिरवणूकीपर्यत सगळं अगदी दणक्यात साजरं करण्यात आलं. वेगवेगळी सजावट (Decoration), अनोखे देखावे आणि बाप्पाची दणक्यात मिरवणूक यासाठी प्रत्येक मंडळाने वेगवेगळ्या शक्कल लढवल्या. ढोलताशा पथक, डीजे (DJ), लेझर लाइट (Laser Light) अशी दमदार तयारी करण्यात आली. मात्र मिरवणूकीत वापरण्यात येणारे लेझर डोळ्यांसाठी अतिघातक असल्याचा इशारा नेत्ररोग तज्ञांनी (Eye Specialist) दिला होता. त्याप्रमाणे पोलिसांनी (Police) देखील संबंधीत सुचना दिल्या होत्या. तरी अनेक सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझर शोचा (Laser Show) वापर केला.

 

पण या लेझर लाईट शोचे (Laser Light Show) भयंकर दुष्परिणाम आता कोल्हापूरातील (Kolhapur) जनतेला भोगावे लागत आहे. लेझर शो (Laser Show) असलेल्या गणपती मिरवणूत सहभागी झालेल्या तब्बल 65 हून अधिक नागरिकांच्या डोळ्याला गंभीर (Eye Infection) इजा झाली आहे. काहीच्या डोळ्यात रक्त साचलं आहे तर काहींची दृष्टी कमी झाली आहे. मात्र यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली आत आहे. लेझर शोच्या (Laser Show) हौसे पोटी मिरवणूकीत सहभागी झालेल्या लोकांना आता गंभीर परिणामांणा समोर जावे लागत आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना (Kolhapur) हा लेझर शो (Laser Show) चांगलाचं महागात पडला आहे. (हे ही वाचा:- Mumbai-Maharashtra Rain Update: राज्यभरात पुन्हा मुसळधार तर मुंबईसह उपनगरात दमदार पावसाची हजेरी)

 

या लेझर शोमुळे (Laser Show) अनेकांना डोळ्या संबंधीत विविध व्याधी जाणवत आहेत. काही दिवसात हा त्रास बरा होईल अशी समज या लोकांनी करुन घेतली असली तरी संबंधीत इन्फेक्शन (Infection) बाबत  तातडीने नेत्ररोग तज्ञांची (Eye Specialist) संपर्क साधून उपचार घ्यावा अशा सुचना तज्ञांकडून देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर पोलिसांकडून (Kolhapur Police) लेझर शोवर (Laser Show) बंदी असुन देखील लेझर शो केल्यामुळे या अतिउत्साही गणेशमंडळांवर कारवाई होईल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.