पालघर येथे झालेल्या बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला, 6 जण मृत्यू तर 45 जखमी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पालघर (Palghar) येथील तोरंगणा घाटात रविवारी (25 मार्च) एक खासगी बस 25 फुट दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत काल 4 जणांचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते. तर सोमवारी अपघतातील मृतांचा आकडा वाढला असून 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

मोखाडा-त्र्यंब्यकेश्वर मार्गावर रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास एक खासगी बस पालघरकडे येत होती. त्यावेळी घाटात चालकाचे बसवरील नियंत्रण सूटून ती दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमींना वैद्यकीय उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.(हेही वाचा-भीषण अपघात: मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावर बस दरीत कोसळून 4 जणांचा मृत्यू, 45 लोक जखमी)

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह सुरक्षा दलसुद्धा घटनास्थळी उपस्थित झाले. त्याचसोबत अद्याप बस दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याते सांगितले जात आहे.