Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात मुंबई, पुणे, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण, जाणून घ्या आजची जिल्हानिहाय आकडेवारी

पाहूया महाराष्ट्रातील COVID-19 रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी: (5 जुलै रात्री 8 पर्यंत)

Coronavirus (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे (Coronavirus)थैमान सुरुच असून दिवसागणिक राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) काल (5 जुलै) दिवसभरात 6 हजार 555 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 2 लाख 6 हजार 619 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 822 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 11 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र या सोबत नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत (Mumbai) असून त्यापाठोपाठ ठाणे,पुणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे 84,524 रुग्ण असून ठाण्यात आतापर्यंत एकूण 47,935 रुग्ण आढळले आहेत. Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज 1,311 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 84,125 वर

पाहूया महाराष्ट्रातील COVID-19 रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी: (5 जुलै रात्री 10 पर्यंत)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 84524 4899 55884
ठाणे 47935 1270 18156
पुणे 28142 872 13406
पालघर 7470 126 2965
औरंगाबाद 6568 294 2788
रायगड 5840 106 2741
नाशिक 5216 225 2935
जळगाव 4236 278 2420
सोलापूर 3214 296 1692
नागपूर 1719 15 1296
अकोला 1662 86 1199
सातारा 1337 48 769
धूळे 1248 62 704
कोल्हापूर 920 12 732
जालना 719 24 380
रत्नागिरी 712 27 471
अमरावती 690 30 451
अहमदनगर 580 15 357
सांगली 430 11 251
लातुर 425 22 229
नांदेड 394 14 242
यवतमाळ 338 11 235
बुलडाणा 318 13 169
हिंगोली 294 1 250
उस्मानाबाद 264 12 186
सिंधुदुर्ग 246 5 172
नंदुरबार 197 9 83
गोंदिया 167 2 104
बीड 142 3 95
अन्य जिल्हे 133 25 0
परभणी 128 4 83
वाशिम 120 3 82
चंद्रपूर 110 0 63
भंडारा 91 0 77
गडचिरोली 73 1 60
वर्धा 17 1 13
एकुण 206619 8822 111740

तर भारतात एकूण 6 लाख 4 हजार 641 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 17 हजार 834 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 59 हजार 860 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now