सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनामुळे अवघ्या 4 दिवसांत 5 कर्मचा-यांचा मृत्यू
(संग्रहित प्रतिमा)

राज्यात कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला असून अनेकांना मृत्यूच्या जबड्यात ओढत आहे. सोलापूरात (Solapur) देखील तीच परिस्थिती आहे. मात्र त्यात एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. ABP माझा दिलेल्या वृत्तानुसार, सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अवघ्या 4 दिवसांत 5 कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी काही जणांचे वय हे अवघे 35 ते 40 च्या दरम्यान आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्न धान्य वितरण विभागात काम करणाऱ्या बापूय्या स्वामी यांचं 9 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यांचं वय 45 वर्ष होतं. अन्न धान्य वितरण विभागात अव्वल कारकून म्हणून ते कार्यकत होते. बापूय्या स्वामी यांचा 9 एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. बापूय्या स्वामी यांना अवघ्या 11 आणि 7 वर्षाच्या दोन मुली आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.हेदेखील वाचा- कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबवा महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

जिल्ह्याच्या कृषी विभागात आंधळगाव मंडळातील मारापूर मुख्यालयाचे कृषी साहायक असलेल्या प्रशात कोळी यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला. 17 एप्रिल रोजी प्रशांत कोळी यांचा मृत्यू झाला. तर कृषी विभागात दुसऱ्या दिवशी आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. कार्यालयात कृषि पर्यवेक्षक असलेल्या अशोक कुंभार यांचा देखील कोरोनाने बळी घेतला.

दरम्यान अनेक निर्बंध घालूनही राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात आता अधिक कडक प्रमाणावर निर्बंध लावण्याची गरज सरकारमधील अनेक मंत्र्यांनी कालच्या (20 एप्रिल) मंत्रिमंडळ बैठकीत बोलून दाखवली. कोरोना व्हायरसची राज्यातील साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली. या चर्चेवेळी राज्यात पुन्हा एकदा 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लावण्यात यावा अशी चर्चा झाली. राज्य मंत्रिमंडळातील बैठकीनंतर मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज्यातील लॉकडाऊनची आज (21 एप्रिल) घोषणा करण्याची शक्यता आहे.