मुंबई: बीकेसी मध्ये 37 वर्षीय व्यक्तीची हत्या, अधिक तपास सुरु
Representational Image (Photo Credits: Facebook)

मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात एका 37 वर्षीय इसमाची संशयित रित्या हत्या झाल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री (21 ऑक्टोबर) ही घटना घडली असून हा हत्या कोणी व कशासाठी केली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी IPC सेक्शन 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत. हे हत्या कोणत्या उद्देशाने करण्यात आली तसेच मृत व्यक्ती कोण होता याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नसून पोलीस अधिक तपास करत आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री गूढरित्या ही हत्या झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळाली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील कामाठीपूरा परिसरात वेश्या व्यवसाय करणा-या एका महिलेची आर्थिक वादातून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मृत महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत असून अर्थिक वादातून ही हत्या झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भांडण सुरु असताना मध्यसी पडलेल्या तरुणावरही आरोपीने चाकू हल्ला करत तेथून पळ काढला. जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्थानिक पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

हेदेखील वाचा- हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांची गोळी झाडून हत्या, पोलिसांकडून तपास सुरु

रेश्मा शेख असे कमाठीपूरा येथे वैश्य व्यवसाय करणाऱ्या मृत महिलेचे नाव आहे. तसेच जितेंद्र सिंह असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. रेश्मा आणि जितेंद्र अनेक वर्षांपासून एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. परंतु, सोमेवारी रेश्मा आणि जितेंद्र आर्थिक वाद झाला. या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. दरम्यान, जितेंद्र हा रेश्माला अपशब्दांचा वापर करु लागला. त्यावेळी रेश्मानेही जितेंद्र याला अपशब्द वापरुन शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर जितेंद्र अधिकच भडकला आणि जवळ असलेल्या चाकूने रेश्मावर वार करु लागला. रेश्माचा आवाज ऐकून जितेंद्र याला रोखण्यासाठी आलेल्या तरुणावरही आरोपीने हल्ला करुन पळ काढला. रेश्माचा पती किशन मंडाळ याने या प्रकणाची पोलिसांनी माहिती देत जितेंद्र याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.