Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,237 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,44,626 वर
Medical workers (Photo Credits: IANS)

मुंबईमध्ये (Mumbai) आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 1,237 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,44,626 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये 851 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,16,351 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये एकूण 20,325 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये 30 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 7,623 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बीएमसीने (BMC) ने याबाबत माहिती दिली. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 23 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते.

त्यातील 21 रुग्ण पुरुष व 9 रुग्ण महिला होत्या. 22 जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 8 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.81 टक्के आहे. 29 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 7,62,672 इतक्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुष्पटीचा दर 86 दिवस झाला आहे.

एएनआय ट्वीट -

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 29 ऑगस्ट नुसार मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 559 इतकी आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती 6,093 इतक्या आहेत. राज्याबाबत बोलायचे झाले तर, महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) आज 16,408 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7690 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 5,62,401 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण 1,93,548 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.