Coronavirus Update: महाराष्ट्रात आज 16,408 नवे कोरोना रुग्ण, एकुण 7.80 लाख रुग्णांंपैकी पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित, पहा पुर्ण आकडेवारी
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixarby)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोनाचे 16,408 नवे रुग्ण आढळुन आल्याने एकुण कोरोनाबाधितांंची (COVID 19 Total Cases)  संंख़्या ही 7 लाख 80 हजार 689 वर पोहचली आहे. आजच्या दिवसात कोरोनामुळे 296 मृत्युंची नोंद झाली असुन एकुण कोरोना बळींंचा आकडा (Coronavirus Deaths) 24,399 इतका झाला आहे. दुसरीकडे आजच्या दिवसात 7,690 कोरोना रुग्णांंनी या विषाणुवर मात केली आहे ज्यामुळे आजवर च्या डिस्चार्ज (Coronavirus Recovered Patients)  मिळवलेल्यांंची संंख्या 5,62,401 इतकी झाली आहे. सद्य घडीला राज्यात कोरोनाचे केवळ 1,93,548 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Coronavirus Active Cases) आहेत. महाराष्ट्र आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार, आज घडीला मुंंबईला ही मागे टाकत पुण्यातील (Pune)  कोरोनाबाधितांंची संंख्या सर्वाधिक झाली आहे. पुण्यात 51,909 अ‍ॅक्टिव्ह तर 1 लाख 73 हजार 174 इतकी संपुर्ण रुग्ण संख्या आहे.

देशात कोरोना व्हायरस रिकव्हरी रेट 76.61 टक्क्यांवर; आजवर 27 लाखाहुन अधिक जण कोरोनामुक्त- आरोग्य मंंत्रालय

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांंची संंख्या दिवसागणिक वाढत असली तरी तितक्याच वेगाने रिकव्हरी रेट सुद्धा वाढत आहे, सध्या राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट हा 72.04 % आहे तर मृत्यु दरात घट होउन तो 3.13 % वर पोहचला आहे.

ANI ट्विट

दरम्यान, आज जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माध्यमातुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोनाचा सर्वाधिक प्रसार झालेल्या टॉप 10 देशांंच्या यादीतील तब्बल सहा देशांंच्या आकडेवारीला एकट्या महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांंच्या संख्येने मागे टाकले आहे. ही परिस्थीती असुनही राज्यात मुळ अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी असल्याने आणि रिकव्हरी रेट दिलासादायक असल्याने परिस्थीती नियंंत्रणात आहे असे म्हणता येईल.