उल्हासनगर: इमारतीचा स्लॅब कोसळून 3 ठार 2 जखमी, मृतांमध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीचा समावेश
Ulasnagar Accident (Photo Credits: Twitter)

उल्हासनगरमध्ये रविवारी दुपारी इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. इंदिरा गांधी मार्केट परिसरामध्ये (Indira Gandhi Market) ही दुर्घटना घडली आहे. या इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन जण जखमी आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बाहेर काढलेल्या मृतदेहांमध्ये प्रिया मौर्या या पाच वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. अनंता मौर्या आणि एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

स्लॅब कोसळल्यानंतर तात्काळ पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.