Coronavirus: पुण्यात 3 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू, मृतांमध्ये 11 वर्षाच्या मुलाचाही समावेश
Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतांच्या संख्येतही हळूहळू वाढ होत आहे. पुणे आरोग्य विभागाने माहितीनुसार पुण्यात (Pune) 3 नव्या कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून यात 11 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. पुण्यात सध्या 2132 कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 118 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सद्य स्थितीत पुण्यात 2226 कोरोना बाधित रुग्ण असल्याची माहिती महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने दिली आहे.

महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 541 वर पोहचली आहे. यापैकी 2645 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबई व उपनगरात आढळून आले आहेत, एकट्या मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या ही 9,310 इतकी मोठी आहे. तर मुंबई पाठोपाठ पुणे, ठाणे, नाशिक जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. Coronavirus Update: पिंपरी चिंचवड मध्ये 2 चिमुकल्यांसहित कोरोनाचे आठ नवे रुग्ण; जिल्ह्यातील COVID19 रुग्णांची संख्या 132 वर

तर भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 46433 पर्यंत पोहचला आहे. दरम्यान यापैकी 32134 जणांवर देशभरात उपचार सुरू असून 12,727 जण कोरोनावर मात पुन्हा घरी परतले आहे. तर मृतांचा आकडा हा 1568 पर्यंत पोहचला आहे. दरम्यान मागील 24 तासांत 3900 नवे रूग्ण तर 195 बळी गेले आहेत. ही आत्तापर्यंत दिवसभरात नव्या रूग्णांची भर आणि बळींच्या संख्येत झालेली सर्वात मोठी वाढ आहे.

Coronavirus Outbreak: भारतात ४६,४३३ तर महाराष्ट्रात १४,५५१ कोरोना रुग्ण; राज्यात एकूण ५८३ मृत्यू - Watch Video

तसेच जगभरात आतापर्यंत तब्बल 2,50,000 पेक्षाही अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी (Johns Hopkins University) मधील सेंटर फॉर सिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग (सीएसएसई) ने जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. यात मंगळवार सकाळपर्यंत जगभरात 2,51,510 इतक्या नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.