Thane Collapse: ठाणेमधील राबोडी परिसरात 4 मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 3 जण जखमी
Thane Collapse

महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे (Thane) शहरात रविवारी सकाळी एका निवासी इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जण जखमी झाल्याची माहिती नागरी अधिकाऱ्यांनी दिली. राबोडी (Rabodi) परिसरात असलेल्या चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब सकाळी सहाच्या सुमारास कोसळला, अशी माहिती ठाणे महापालिकेचे (TMC) उपायुक्त अशोक बुरपुल्ले (Deputy Commissioner Ashok Burpulle) यांनी दिली. सतर्क झाल्यानंतर स्थानिक अग्निशमन दल (Fire brigade) आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर  त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन लोकांना बाहेर काढले, असे त्यांनी सांगितले. तीन जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

या इमारतीत एकूण 73 फ्लॅट आहेत. ते म्हणाले की, इतर सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. नागरी अभियंते इमारतीची तपासणी करतील, असे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान मागील काही  महिन्यांपासून इमारतीचा भाग कोसळण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यात अनेक लोक जखमी झाले आहेत. तर काहींचा यात नाहक बळी गेला आहे. असे अपघात टाळण्यासाठी  इमारतीची वेळोवेळी डागडूजी करणे गरजेचे आहे. यामुळे असे अपघात काही प्रमाणात कमी होतील.