Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रामध्ये आज 7,975 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 2,75,640 वर
Coronavirus Cases (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू (Coronavirus) बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात 233 मृत्यू आणि 7,975 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 2,75,640 वर पोहोचली आहे. आज राज्यात 3,606 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत तब्बल 1,52,613 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या महाराष्ट्राचा रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) 55.37 टक्के आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.96 टक्के इतका आहे. सध्या राज्यात एकूण 1,11,801 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यामध्ये मुंबई, ठाणे व पुणे हे सर्वात बाधित जिल्हे आहेत. मुंबई शहरामध्ये आज 1,390 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. यासह मुंबईमधील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 96,253 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 62 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्त्यू झाला असून, आतापर्यंत 5464 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एएनआय ट्वीट -

 

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आता झोपडपट्टीपेक्षा उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे या सोसायट्यांकडे लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मुंबईचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी इथे आज 23 नवे कोरोना रुग्ण सापडल्याने, धारावीतल्या कोरोना रुग्णांची संख्या 2,415 झाली आहे. (हेही वाचा: मुंबईमध्ये आज 1,390 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 96,253 वर)

दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसचा फटका फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पोलिसांनाही बसला आहे. मार्च महिन्यापासून ते आतापर्यंत 82 पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे कोविड-19 मुळे निधन झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत 6,400 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 5,100 जणांची प्रकृती सुधारली असून, अद्याप 1213 जणांवर उपचार चालू आहे. त्यातील 150 अधिकारी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात कोरोनासंबंधित उपचार )येत आहेत. तर 48 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यात अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे.