Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,628 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,87,778 वर
आज ही संख्या थोडी कमी झाली आहे. आज मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 1,628 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,87,778 वर पोहोचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे रोज 2 हजाराच्या वर रुग्ण आढळून येत होते. आज ही संख्या थोडी कमी झाली आहे. आज मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 1,628 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,87,778 वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये आज कोरोनाचे 1,669 रुग्ण बरे झाले आहेत, यासह आतापर्यंत एकूण 1,52,204 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या मुंबईमध्ये 26,644 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये 47 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 8,549 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 37 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 31 रुग्ण पुरुष व 16 रुग्ण महिला होत्या. यातील 2 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 32 जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 13 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के झाला आहे. 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.16 टक्के आहे. 21 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 10,22,711 इतक्या आहेत, तर मुंबईतील दुप्पटीचा दर 60 दिवस झाला आहे. (हेही वाचा: सशस्त्र दलातील कोविड रुग्णांसोबतच सामान्य पुणेकरांवर Army Institute of Cardio Thoracic Sciences मध्ये कोरोनाचे उपचार; रुग्ण बरे होण्याचा दर 81 %)
एएनआय ट्वीट -
शहरातील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 21 सप्टेंबर नुसार सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) 617 आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती 10,065 इतक्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये आज कोरोनाच्या 18,390 रुग्णांची नोंद झाली आहे. आज शहरामध्ये कोरोनाचे 20,206 रुग्ण बरे झाले आहेत व आज 392 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 12,42,770 झाली आहे. यामध्ये 2,72,410 सक्रीय रुग्ण आहेत, 9,36,554 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत आणि 33, 407 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.