भिवंडीत 14 वर्षीय मुलाची हत्या
फोटो सौजन्य- फाइल इमेज

भिवंडीमध्ये एका 14 वर्षीय मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी घडली आहे. त्यामुळे भिवंडी परिसरात या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.

भिवंडी येथे राहणारा बिलाल शकील कुरेशी असे या 14 वर्षीय मुलाचे नाव आहे. तर त्याच्या वडिलांचे विठ्ठल नगर येथे मटनाचे दुकान आहे. बिलाल हा 28 ऑक्टोंबर रोजी वडिलांच्या दुकानावर जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्याचे अपहरण केले. या घटनेनंतर पोलिसांनी बिलालचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. अखेर बिलालची हत्या करुन त्याचा मृतदेह महामार्गाजवळील पाईपलाईन येथे फेकून देण्यात आला होता.

या घटनेने बिलालच्या घरच्यांना धक्का बसला आहे. तसेच त्यांनी पोलिसांना चौकशीदरम्यान पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन आल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस अरोपींचा शोध घेत असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.