Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना व्हायरसच्या 1372 नवीन रुग्णांची व 41 मृत्यूंची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 23,935 वर
Coronavirus in India (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीबाबत मुंबई (Mumbai) हे शहर देशातील सर्वात बाधित शहर आहे. मुंबईत आज आणखी 1372 नवीन कोविड-19 रुग्णांची आणि 41 मृत्यूची नोंद झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता 23,935 वर पोहोचली आहे. आज एकूण 826 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. आज एकूण 350 रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सोडले आहे. अशाप्रकारे आजपर्यंत एकूण 6466 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई आजपर्यंत एकूण 841 कोरोना व्हायरस मृत्यूंची नोंद झाली आहे.

एएनआय ट्वीट -

मुंबईमध्ये झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळून आला आहे. यामध्ये धारावी (Dharavi) अग्रणी आहे. धारावी मध्ये आज कोरोनाचे नवे 25 रुग्ण आढळून आले आहेत. यानुसार आता धारावी भागातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा हा 1378 वर पोहचला आहे. राज्याबद्दल बोलायचे झाल्यास, राज्यात आज 2250 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे व अशाप्रकारे एकूण संख्या आता 39,297 अशी झाली आहे. यामध्ये सकारात्मक गोष्ट म्हणजे आज नवीन 679 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 10,318 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 27,581 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

(हेही वाचा: महाराष्ट्रात आज 2250 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 39,297 वर)

दरम्यान, राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार, क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1849 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून, आज एकूण 15 हजार 495 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून, त्यांनी 65.11 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.