Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज 1,310 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,04,572 वर
Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

राज्याची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज 1,310 कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. अशाप्रकारे शहरातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,04,572 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये एकूण भर्ती झालेले संशयीत रुग्णसंख्या 1,055 आहे. मुंबईमध्ये आज 1563 रुग्ण कोरोना व्हायरसमधून बरे झाले आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 75,118 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरामध्ये एकूण सक्रिय रुग्ण 23,582 इतके आहेत. आज मुंबईमध्ये 58 कोरोना विषाणू रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 5872 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 48 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 37 रुग्ण पुरुष व 21 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 5 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 41 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 12 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 71 टक्के आहे. 16 जुलै ते 21 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.17 टक्के होता. 21 जुलै 2020 पर्यंत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 4,50,459 इतक्या झाल्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर आजही कालच्याप्रमाणे 59 दिवस राहिला आहे.

एएनआय ट्वीट-

मुंबईमधील विविध कोरोना सुविधा केंद्रातील क्षमतेबाबत बोलायचे झाले तर, 21 जुलै पर्यंत एकूण खाटांची क्षमता 16,811 इतकी आहे. आयसीयु बेड्स/व्हेंटीलेटर बेड्सची संख्या 1748/1054 इतकी आहे, तर ऑक्सिजन बेड्सची संख्या 11,288 इतकी आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 21 जुलै नुसार सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 639 इतकी असून, सध्या सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 6100 आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज दिवसभरात 10,576 कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद)

दरम्यान एकेकाळी मुंबईच्या बाधित परीसरापैकी असणाऱ्या धारावीत आज कोरोनाचे फक्त 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. अशाप्रकारे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 2,507 झाली आहे.