Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

Maharashtra Board Recognition : पेन्शन, वेतन, पदभरती या विविध मागण्यांसाठी राज्यातील शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला (Boycott of answer sheet checking) आहे. मात्र, आता शिक्षकांना हा निर्णय चांगलाच भोवणार आहे. कारण, उत्तर पत्रिका न तपासता परत केल्यास शाळा - महाविद्यालयांची मान्यता रद्द ( schools Recognition Will Be Canceled) करण्याचा कडक इशारा विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी दिला आहे.

काय म्हटलयं शिक्षण मंडळानं?

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू (10th and 12th board exam) झाल्या आहेत. तर, 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळं वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत करावी. त्याशिवाय, उत्तरपत्रिका न तपासता परत केल्यास विभागीय शिक्षण मंडळाकडून संबंधित शाळा-महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

शिक्षक बहिष्कारावर ठाम

राज्यातील शिक्षक त्यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीच्या बहिष्कारावर ठाम आहेत. शिक्षकांनी आपल्या समस्या सांगण्यासाठी यापूर्वीही आंदोलने केली आहेत. तरी देखील शिक्षकांच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत. वारंवार आंदोलने करून केवळ आश्वासन मिळतात, म्हणून शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होताच उत्तरपत्रिका तपासणी करण्यावर शिक्षकांनी बहिष्कार टाकला होता. त्या पार्श्वभूमीवर विभागीय शिक्षण मंडळांच्या अध्यक्षांनी शिक्षकांना इशारा दिला आहे.

शिक्षकांच्या नेमक्या कोणत्या मागण्या आहेत?

अनुदानातील जाचक अटी रद्द करणे, शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने पदभरती करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे अशा विविध मागण्यांसाठी शिक्षक आंदोलन करत आहे. परीक्षांच्या उत्तरपत्रिका शिक्षक तपासणार नाही, अशी भूमिका शिक्षकांनी घेतली होती.