Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज 1,223 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; सध्या 20,211 संक्रमितांवर उपचार सुरु 
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) मध्ये आज 1,223 कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची व 53 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह शहरातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,13,187 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 1058 कोरोना बाधित रुग्ण बरे आहेत, यासह शहरामध्ये आतापर्यंत एकूण 86,385 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 20,211 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज मुंबईमध्ये 735 कोरोना विषाणू संशयित रुग्णांची भरती करण्यात आली. आजच्या 53 मृत्युंसह एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6,297 इतकी झाली आहे. बीएमसी (BMC) ने याबाबत माहिती दिली.

आज मृत्यू झालेल्या पैकी 40 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 35 रुग्ण पुरुष व 18 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 1 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 32 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 20 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर सध्या 76 टक्के आहे. 23 जुलै ते 29 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.93 टक्के राहिला होता. 29 जुलै 2020 पर्यंत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 5,16,714 इतक्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 75 दिवस झाला आहे. (हेही वाचा: BEST लपवत आहे कोरोना व्हायरस मुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या; आतापर्यंत 107 जणांचा मृत्यू, युनियनचा दावा)

बीएमसी ट्वीट -

 

मुंबईमधील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल बोलायचे झाले तर, 29 जुलै नुसार सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 616 आहे व सक्रिय सीलबंद इमारती 6173 इतक्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूचे 11,147 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 266 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 4,11,798 इतका झाला आहे.