अभिमानास्पद! महाराष्ट्र पोलिस खात्यातील 11 अधिकार्‍यांना 'केंद्रीय गृहमंत्री पदक'
(Photo Credits: Facebook)

आज, 13 ऑगस्ट ला गृहखात्यातर्फे (Ministry Of Home Affairs) केंद्रीय गृहमंत्री पदकाने (Union Home Minister’s Medal ) देशातील 96 तपास अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra Police) तब्बल 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उत्कृष्ट तपास व शोधकार्यासाठी तसेच गुन्हे तपासातील कौशल्याचा सन्मान व्हावा व तपासाचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्यावर्षीपासून या पदकांची सुरुवात करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री पदकविजेत्यांमध्ये सीबीआयचे 15 तपास अधिकारी, महाराष्ट्र पोलीस दलातील 11 अधिकारी, उत्तर प्रदेश पोलीस दलातील 10 अधिकारी, केरळ पोलीस दलातील 9 अधिकारी, मध्य प्रदेश पोलीस दलातील 8 अधिकारी, दिल्ली व कर्नाटक पोलीस दलातील 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात 13 महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही बाजी मारली आहे.

प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातील पदकविजेते अधिकारी खालीलप्रमाणे:

अविनाश लक्ष्मीकांत आघाव (पोलीस निरीक्षक)

श्रद्धा अशोक वायदंडे (सहायक पोलीस निरीक्षक)

सागर जगन्नाथ शिवलकर (पोलीस निरीक्षक)

संजय देवराम निकुंबे (पोलीस निरीक्षक)

सुधाकर दत्तू देशमुख (पोलीस निरीक्षक)

सचिन सदाशिव माने (सहायक पोलीस निरीक्षक)

सुरेश नानाभाऊ रोकडे (पोलीस निरीक्षक)

प्रदीप विजय भानुशाली (पोलीस निरीक्षक)

प्रशांत श्रीराम अमृतकर (पोलीस उपअधीक्षक)

हेमंत सुभाष पाटील (पोलीस निरीक्षक)

प्रियांका महेश शेळके (सहायक पोलीस निरीक्षक)

महाराष्ट्र्र पोलिसांसाठी ही अतिशय मानाची बाब असून यामध्ये दोन महिला पोलिसांचा सुद्धा समावेश आहे.  पोलिस खात्यामध्ये उत्कृष्ट तपास व शोधकार्यासाठी हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. पोलिस खात्यामध्ये तपासाचा दर्जा सुधारावा म्हणून या खास पुरस्कारांची योजना करण्यात आली आहे.