Coronavirus in Mumbai: मुंबईत आज कोरोना व्हायरसच्या 1062 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,06,891 वर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

आज मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) 1062 रुग्णांची व 54 मृत्यूची नोंद झाली आहे. अशाप्रकारे मुंबईमधील एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या वाढून 1,06,891 झाली आहे. यामध्ये 78,260 रूग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. आज शहरामध्ये 1158 रूग्ण बरे झाले आहेत. शहरामध्ये आतापर्यंत एकूण 5981 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज मुंबईमध्ये 1051 कोरोना व्हायरस संशयित रुग्णांची भर्ती झाली आहे. सध्या शहरामध्ये 22647 सक्रीय रुग्णांवर उपचार चालू आहेत. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली.

आज मृत्यू झालेल्या 37 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यातील 37 रुग्ण पुरुष व 17 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 6 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 39 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 9 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 73 टक्के झाला आहे. 18 जुलै ते 23 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.09 टक्के राहिला आहे. 23 जुलै 2020 पर्यंत मुंबईमध्ये झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 4,62,721 इतक्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर आता 64 दिवस झाला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज 9 हजार 615 नवे कोरोना रुग्ण; तर 278 जणांचा मृत्यू)

एएनआय ट्वीट -

सध्या मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) यांची संख्या 625 इतकी असून, सक्रिय सीलबंद इमारती 6108 आहे. दरम्यान, कोविड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मागील चार महिन्यांपासून सर्वात आधाडीवर असलेल्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची (फ्रन्टलाईन वॉरियर्स) कोरोना चाचणी करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. यामध्ये विविध खात्यातील कोविड-19 विषयक कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच बंदोबस्तात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांची देखील 'अॅण्टीजेन कीट' द्वारे चाचणी केली जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज (दिनांक 24 जुलै 2020) पासून या उपक्रमास आरंभ केला.