Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात आज 10,309 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 4,68,265 वर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र राज्यात आज 10,309 कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे व यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 4,68,265 अशी झाली आहे. आज राज्यात नवीन 6,165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3,05,521 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,45,961 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 334 रुग्णांचे मृत्यू झाले असून, आतापर्यत एकूण 16,476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.25 टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 24 लाख 13 हजार 510 नमुन्यांपैकी 4 लाख 68 हजार 265 म्हणजेच 19.40 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 9 लाख 43 हजार 658 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 36 हजार 466 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 334 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.52 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या मुंबई नंतर पुणे व ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. (हेही वाचा: Heavy Rains In Mumbai: पावसामुळे मुंबई लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची NDRF पथकाकडून सुटका)

एएनआय ट्वीट -

आज नोंद झालेल्या एकूण 334 मृत्यूंपैक़ी 242 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 60 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 32 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना व्हायरसच्या 1,125 रुग्णांची व 42 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह मुंबईमधील एकूण रुग्णांची संख्या 1,19,255 वर पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे राज्यातील कोरोना व्हायरसचा प्रसार हा आता नियंत्रणात आला असल्याची माहिती मिळत आहे. आजपासून (5 ऑगस्ट) राज्यातील लॉक डाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणून अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.