Maharashtra: ठाण्यातील 10 वर्षीय मुलीने सायकलवर 3600 किमी अंतर कापले, काश्मीरहून 38 दिवसांत पोहचली कन्याकुमारीला
(Photo Credit - Pixabay)

ठाणे जिल्ह्यातील 10 वर्षीय सई पाटील (Sai Patil) हिने वाहनांच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या हानीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने काश्मीर ते कन्याकुमारी (Kashmir to Kanyakumari) दरम्यान सायकलने 3600 किमी (Cycled 3600 KM) अंतर कापून एक उदाहरण समोर ठेवले आहे. सईने देशाच्या उत्तरेकडील टोकापासून दक्षिणेकडील टोकापर्यंतचे हे अंतर सायकलने 38 दिवसांत कापले. या प्रवासात सईचे वडील सोबत होते. सईने गेल्या महिन्यात ही मोहीम लोकांमध्ये वाहन प्रदूषण आणि मुलीच्या जीवनातील महत्त्वाविषयी जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने सुरू केली होती.

यादरम्यान, सई दररोज किमान 100 किलोमीटर सायकल चालवत असे तसेच शाळा आणि इतर ठिकाणांना भेट देऊन वाहनांच्या प्रदूषणाबद्दल आणि मुलीच्या जीवनातील महत्त्वाबद्दल लोकांना जागरूक करत असे. सईने रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदवण्याची पात्रता पूर्ण केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सई म्हणाली की, या संपूर्ण प्रवासात ती जिथे जिथे गेली तिथे तिला लोकांचे खूप प्रेम आणि आपुलकी मिळाली. (हे ही वाचा MHADA Admit Card 2021-2022: म्हाडा परीक्षेसाठी हॉलतिकीट्स जारी; mhada.gov.in वरून अशी करा डाऊनलोड)

असिस्टंट प्रोफेसरने 40 हजार किलोमीटरहून अधिक सायकलिंग करून केला विक्रम

त्याचवेळी, याच्या एक दिवस आधी, मेघालयच्या पूर्व पश्चिम खासी हिल जिल्ह्यातील मावनई गावात राहणारे 40 वर्षीय सहायक प्राध्यापक (डॉ. पिनियरलांग नोंगब्र) यांनी 40 हजार किलोमीटर सायकलिंग करून इतिहास रचला आहे. मेघालय सायकलिंग असोसिएशनच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांच्या आवडीने इतर अनेक तरुणांना 2022 मध्ये सायकल वापरण्यास प्रेरित केले कारण पर्यावरणाची चिंता सर्वात जास्त आहे. आरोग्य आणि पर्यावरणासाठी तरुणांना सायकल वापरण्यासाठी प्रेरित करणे हा त्यांचा उद्देश आहे.