Bedtime Habits and Screen Time: झोपण्याच्या सवयी आणि वाढता स्क्रीन टाइम म्हणजे 'द सायलेंट रिलेशनशिप किलर'
झोपायच्या आधी जोडप्यांच्या सवयी त्यांच्या भावनिक आणि शारीरिक (Emotional Intimacy) जवळीकांवर लक्षणीय परिणाम करू शकतात, ज्यामुळे त्यांचे बंध हळूहळू नष्ट होतात.
आजच्या धावपळीच्या जगात, अनेक जोडप्यांना (Couples) कळत नकळत त्यांचे नाते (Relationships) डोळ्यासमोर संपत जाताना दिसते. यामध्ये मोठे संघर्ष हे जरी स्पष्ट गुन्हेगारासारखे वाटू शकत असले तरी, त्याची खरी सुरुवात आणि नुकसान अनेकदा किरकोळ सवयींमुळे होते. विशेषत: झोपेच्या वेळा, झोपेची सवय (Bedtime Habits) आणि कमतरता. होय, कमी झोप (Sleep) ही नात्यात दुरावा आणू शकते. हे
नात्यात झोपण्याच्या सवयींची भूमिका
झोपण्याची वेळ हा दिवसातील काही क्षणांपैकी एक महत्तावाचा घटक असतो. जेव्हा जोडपे विचलित न होता परस्परांशी एकरुप होऊ शकतात. दिल्लीस्थित एक रिलेशनशिप कौन्सेलर सांगतात, हे क्षण जवळीक वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. "शारीरिक जवळीक, मिठी मारणे, हलकीशी चापटी मारणे, हात पकडणे, मसाज यामुळे शरीरात बॉन्डिंग हार्मोन ऑक्सीटोसिन निर्माण होतात. जे एकूणच संबंध सुधारू शकतात. त्यामुळे जोडप्यांनी या बाबींकडे लक्ष आणि त्याला महत्त्व दिले पाहिजे. सुसंगत आणि समक्रमित झोपण्याची वेळ जोडप्यांना अधिक आरामशीर आणि एकरुप होण्यास मदत करते. (हेही वाचा, Sleep Divorce And Relationships: स्लीप घटस्फोट, पुरेशी झोप आणि आनंदी नातेसंबंधांची गुरुकील्ली? घ्या जाणून)
जोडप्यांमध्ये झोपण्यापूर्वी होणाऱ्या संभाषणास महत्त्व
शारीरिक जवळीकापलीकडे, जोडप्यांनी झोपण्यापूर्वी केलेले संभाषण तितकेच महत्त्वाचे आहे. दिवसाच्या घटनांबद्दल अर्थपूर्ण संवादात गुंतणे, असुरक्षा सामायिक करणे आणि इच्छांवर चर्चा केल्याने विश्वास आणि समज निर्माण होऊ शकते. अनेक सायकोलॉजिस्ट सांगतात की, जोडपी एकमेकांमध्ये गुंतून झोपण्यापूर्वी त्यांनी सामायिक केलेल्या वेळेचा ते कसा उपयोग करतात, हा त्यांच्या भावनिक जवळीकीचा अंदाज येण्यास अधिक पूरक ठरते. (हेही वाचा, Women Need More Sleep Than Men: स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते; संशोधनात खुलासा)
झोपण्याच्या विधींची शक्ती
प्रत्येक जोडप्याचे स्वतःचे झोपण्यापूर्वीचे संकेत त्यांच्या नातेसंबंधाच्या आराम आणि अंदाजात योगदान देतात. हे विधी मूक संकेत म्हणून काम करतात, भावनिक जवळीक वाढवतात आणि एकमेकांच्या भावनिक स्थितीत अंतर्दृष्टी देतात. झोपेची गुणवत्ता आणि झोपण्याच्या वेळेची सकारात्मक दिनचर्या जवळीक वाढवतात, तर नकारात्मक सवयींमुळे गैरसमज, दुर्लक्षाची भावना आणि जवळीक कमी होऊ शकते. (डेटिंग नंतर सुद्धा पार्टनरला सोडून का जातात लोक? जाणून घ्या नाते संपुष्टात येण्यामागील कारणे)
स्क्रीन टाइमचे हानिकारक प्रभाव
तथापि, झोपायच्या आधी गॅझेटच्या पडद्याचा व्यापक वापर म्हणजेच 'स्क्रीन टाईम' ही आजच्या काळात नातेसंबंध खराब करणाऱ्या सर्वात सामान्य सवयींपैकी एक आहे. सामाजिक आणि मानसिक आरोग्याचे अभ्यासक इशारा देतात की, टीव्ही पाहणे, सोशल मीडियावर स्क्रोल करणे किंवा लॅपटॉपवर काम करणे यासारख्या कृतीमुंळे संवाद आणि जवळीक यांमध्ये अडथळे निर्माण होतात. "स्क्रीनवरील निळा प्रकाश झोपेच्या गुणवत्तेवर देखील परिणाम करतो, ज्यामुळे चिडचिड होऊ शकते आणि एकमेकांचा संयम कमी होऊ शकतो", असेही हे अभ्यासक सांगतात.