#OOTD : आगोदर Online कपडे खरेदी, मग ते परिधान केल्यावर पुढे...
OOTD | (Archived, edited, representative images)

फेसबुक, व्हाट्सअॅप आणि Instagram म्हणजे स्मार्टफोनच्या दुनियेतील परवलीची ठिकाणं. इंटरनेटवर पडीक असलेल्या तरुणाईसाठी ही ठिकाणं म्हणजे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भागच जणू. सोशल मीडियावर आजकाल Instagram चांगलेच लोकप्रिय झाले आहे. नवे कपडे आणि अॅक्सेसरीज आदींचे फोटो कढून किंवा नवे कपडे, अॅक्सेसरीज अंगावर परिधान करुन ते फोटो Instagram अपलोड करणे. हा तरुणाईचा एक आवडता छंद. पण, तुम्ही सहज म्हणून तरी कधी विचार केला आहे काय? की काणी सर्वसामान्य व्यक्ती दररोज नवे आणि तितकेच महागडे कपडे खरेदी करु शकतो? याबाबत नुकताच एक सर्व्हे झाला. या सर्व्हेने केवळ या प्रश्नाचे उत्तरच दिले नाही. तर, एक गंभीर सत्यही समोर आणले आहे.

नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार, Online ऑर्डर देऊन मागवलेल्या कपड्यांपैकी प्रत्येकी 10 पैकी 1 खरेदीदार आपली ऑर्डर परत करतो. विशेष म्हणजे ऑर्डर परत करणारा खरेदीदार ग्राहक हा ऑनलाईन मागवलेले कपडे परिधान करुन फोटो काढतो आणि पुन्हा ते कपडे परत करतो. हा सगळा प्रकार केवळ #OOTD (Outfit of the day)साठी. गेल्या काही दिवसात #OOTD ची क्रेझ इतकी वाढली आहे की, लोक Online खरेदीसाठी ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण, यातील बरेच ग्राहक ऑर्डरनुसार घरपोच झालेले कपडे परतही करत आहेत. (अर्थात नवे कपडे परिधान करुन विविध फोटो काढून झाल्यावरच) (हेही वाचा, सौंदर्य खुलवणारी 5 स्टायलीश फुटवेअर्स; तुमच्या फॅशनचेही होईल कौतूक)

सुमारे 2002 लोकांचे सर्वेक्षण केल्यावर आलेल्या निष्कर्षात पुढे आले की, खास करुन 35 ते 44 या वयोगटातील लोक असा प्रकार करतात. हा सर्व्हे क्रेडिट कार्ड कंपनी कार्सलेकार्ड (credit card company Barclaycard) ने केला. सोशल मीडियावर असे अनेक व्हेरिफाईड पेज आहेत जी तुम्हाला सेलिब्रेटी लुक भाड्यानेही देतात. म्हणजेच तुम्ही कपडे भाड्याने घ्या आणि एकदोन वेळा पापरुन परत करा.