Janmashtami 2021 Live Streaming Online From Dwarka and Mathura With TV Telecast Time: जन्माष्टमी 2021 निमित्त द्वारका आणि मथुरा येथील मंदिराचे घरबरल्या घेता येणार दर्शन, येथे पाहा लाईव्ह स्ट्रिमिंग
Shri Krishna Janmasthan Temple in Mathura (Photo Credit: ANI)

Happy Krishna Janmashtami 2021: भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात जन्मष्टमीचा सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. हिंदू पुराणानुसार विष्णूचा आठवा अवतार असलेला श्रीकृष्णाचा पृथ्वीवर श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी जन्म झाला. यावर्षी श्रीकृष्णाचा जन्मदिवस 30-31 ऑगस्टदरम्यान साजरा केला जाणार आहे. श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त देशभरातील कृष्ण मंदिरांमध्ये विशेष सजावट करण्यात केली जाते. तर, द्वारका (Dwarka) मथुरा (Mathura) आणि वृंदावनात (Vrindavan) वेगळेच वातावरण पाहायला मिळते. मात्र, आता संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट वावरत असल्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्याची परवानगी नाही. मात्र, मंदिरात जाता येत नसले तरी भाविकांना घरबसल्या द्वारका आणि मथुरा येथील श्रीकृष्णाचे दर्शन घेता येणार आहे.

भाविकांना घरबसल्या भगवान श्रीकृष्णाचे दर्शन तसेच द्वारका आणि मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा उत्सव डीडी नॅशनल चॅनलवर थेट लाईव्ह प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. भाविकांना सोमवारी (30 ऑगस्ट) रात्री 11.30 वाजल्यापासून श्रीकृष्णाचे लाईव्ह दर्शन घेता येणार आहे. याशिवाय, युट्युबवर या दोन्ही ठिकाणची पूजा, कृष्ण जन्म उत्सव पाहता येणार आहे. हे देखील वाचा- Dahi Handi 2021 Wishes in Marathi: दहीहंडी निमित्त मराठी Messages, Greetings, Images आणि GIF's शेअर करुन साजरा करा गोपालकाला!

जन्माष्टमी 2021 निमित्ती द्वारका आणि मथुरा मंदिरातील लाईव्ह स्ट्रिमिंग-

सध्या देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आलेल्या बऱ्याच गोष्टी पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नसून येत्या सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे अजूनही देशातील मंदिरे बंदच ठेवण्यात आली आहेत.