Horoscope Today आजचे राशीभविष्य, शुक्रवार 2 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
आजचे राशीभविष्य

Horoscope Today 2 June 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, शुक्रवार 2 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): आज मेष राशीच्या व्यक्तींसाठी मध्यम दिवस आहे. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनेक बाबींसाठी अनकूल नाही. खर्च आणि प्रवास करताना काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवेल, तणाव राहील त्यामुळे नोकरी-व्यवसायात जास्त लक्ष केंद्रित करा.

शुभ उपाय- घराबाहेर पडताना लाल फुल खिशात ठेवा.

शुभ दान- एखादे लाल रंगाचे वस्त्र दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- लाल

वृषभ (Taurus Horoscope Today): आजचा दिवस मनासारखा व्यतीत कराल. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता परंतु गुंतवणूक करणे टाळा. कौटुंबिक समस्येवर तोडगा निघेल.

शुभ उपाय- तुळशीला नमस्कार करा.

शुभ दान- गरजूंना अन्नदान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- हिरवा.

मिथुन (Gemini Horoscope Today): आजचा दिवस नोकरी-धंद्यात स्पर्धात्मक राहील. सहकाऱ्यावर पूर्णतः विश्वास टाकू नका. नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. भागीदारीमध्ये काम सुरु करणे टाळा. कुटुंबाचा सल्ला फायदेशीर ठरेल.

शुभ उपाय- देवाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- गरजूला कपडे दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- पिवळा

कर्क (Cancer Horoscope Today): मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडेल. मनःस्थिती द्विधा असेल, त्यामुळे आज कोणतेही महत्वाचे निर्णय घेणे टाळा. बोलण्यावर संयम ठेवा. वादविवाद-भांडणापासून दूर रहा.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा.

शुभ दान- गरुजुला पैसे दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पांढरा

सिंह (Leo Horoscope Today): सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम राहील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक व्यवहारात यश मिळण्याची शक्यता. व्यवसायासाठी केलेला प्रवास फलदायी ठरण्याची शक्यता.

शुभ उपाय- देवाला दुधाने स्नान घाला.

शुभ दान- गरजूला अन्न-धान्य दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- आकाशी

कन्या (Virgo Horoscope Today): आज तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे उत्तम ठरेल. घरातील कुणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला फायद्याचा ठरेल. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. आज तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- निळा

तुळ (Libra Horoscope Today): आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अनुकूल राहील. ताणतणाव कमी होण्यास मदत मिळेल. कुटुंबाची साथ लाभेल. जोडीदाराचा सल्ला फायद्याचा ठरेल. आजचा दिवस स्वतःसाठी ठेवा, स्वतःला वेळ द्या.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा.

शुभ दान- मुक्या प्राण्याला जेवण द्या

शुभ अंक- 5

शुभ रंग- पोपटी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज व्यापार-धंद्यात मोठे यश मिळण्याची शक्यता. मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही याची दक्षता घ्या. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त होतील. स्वार्थ सोडून कार्य करा, ज्याचा फायदा होईल.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- केशरी

धनु (Sagittarius Horoscope Today): आजचा दिवस शांततेत व्यतीत कराल. विवाहित लोकांना मुलांच्या शिक्षणावर धन खर्च करावे लागू शकते. घरातील सदस्यांवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. आज कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकते तेव्हा याबाबत सावध रहा.

शुभ उपाय- स्नान झाल्यावर कुलदेवतेची पूजा करा

शुभ दान- शक्य असल्यास रक्तदान करा

शुभ अंक- 9

शुभ रंग- करडा

मकर (Capricorn Horoscope Today): नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम. आपला दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करेल, त्यामुळे तुमच्या अवतीभवतीची लक्ष ठेवा. शक्य असल्यास मित्रांशी भेटणे टाळा, नाहीतर आर्थिक हानी होण्याची शक्यता.

शुभ उपाय- वाहत्या नदीमध्ये नाणे सोडा

शुभ दान- गरजूला धातूचे दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- जांभळा

कुंभ (Aquarius Horoscope Today): कुटुंबातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करा, त्याने फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या. लांबचा प्रवास टाळा. रागावर नियंत्रण ठेवा नाहीतर जवळची व्याज्ती लांब जाण्याची शक्यता. आर्थिक बाबीमध्ये सल्ला घेऊन गुंतवणूक करा

शुभ उपाय- घरात सकाळी धुप-बत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- काचेच्या वस्तूचे दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- गुलाबी

मीन (Pisces Horoscope Today): आज गरजूला केलेल्या मदतीचे उत्तम फळ मिळेल. नवीन होणाऱ्या बदलांचा स्वीकार करा, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या संधी सोडू नका. आर्थिक लाभाची शक्यता मात्र लक्षात घ्या, पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. मित्रांकडून मदत मिळेल.

शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना थोडे काळे तीळ खिशात बाळगा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- पोपटी