नूडल्स, ब्रेड, केक खाऊ नका, आगोदर धोका जाणून घ्या!
खास करुन नूडल्स (Noodles), सफेद ब्रेड (Breads), पॅनकेक (Cakes), फ्लेवर्ड योगर्ट. हे पदार्थ तुम्ही नाष्ट्यात वापरत असाल तर ते त्वरीत बंद करा. त्यापासून असलेला धोका आम्ही आपल्याला सांगत आहोत.
सुदृढ आरोग्यासाठी सकाळी भरपूर नाष्टा (Breakfast) करणे केव्हाही चांगले. आपल्यापैकी बहुतांश मंडळी तो करतातही. परंतू, सकाळी नाष्टा घेताना आहारात तुम्ही काय घेता हे फार महत्त्वाचे आहे. केवळ पोट भरायचे म्हणून तुम्ही नाष्ट्याच्या नावाखाली पोटात काहीही ढकलत असाल तर वेळीच सावधान! भूक भागविण्यासाठी वापरलेला शॉर्टकट तुम्हाला भविष्यात अडचणीत आणू शकतो. खास करुन नूडल्स (Noodles), सफेद ब्रेड (Breads), पॅनकेक (Cakes), फ्लेवर्ड योगर्ट. हे पदार्थ तुम्ही नाष्ट्यात वापरत असाल तर ते त्वरीत बंद करा. त्यापासून असलेला धोका आम्ही आपल्याला सांगत आहोत.
नूडल्स
नुडल्स हे पचायला जड असतात. तसेच त्यात सोडियमची मात्रा अधिक असते. त्यामुळे नाष्ट्याच्या वेळी नुडल्स खाणे शक्यतो टाळावे. दरम्यान, नुडल्सचे उत्पादन करणाऱ्या मॅगीमध्ये शिशाचं प्रमाण अधिक असल्याचे नेस्लेच्या वकिलाने न्यायालयात नुकतेच मान्य केले आहे.
पांढरा ब्रेड
पांढऱ्या ब्रेडमध्ये रिफाइन ग्रेन असते. जे रक्तातील साखर वाढविण्यास मदत करते. तसेच, पांढऱ्या ब्रेडमुळे शरीर एखाद्या आजारालाही निमंत्रण देऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे ब्रेडमधून शरीराला आवश्यक असे घटक मिळत नाहीत. त्यामुळे ब्रेड खाल्ल्यानंतर अल्पावधीतच पुन्हा भूक लागण्याचीही शक्यता असते. (हेही वाचा, मॅगी नूडल्स आरोग्याला धोकादायक? उत्पादनात शिसे असल्याचे नेस्ले कंपनीकडून सुप्रीम कोर्टात मान्य)
पॅनकेक
पॅनकेकची निर्मिती करण्यासाठी मैदा, साखर, लोणी आणि सोडियमचा वापर केला जातो. पॅनकेक पचवण्यासाठी शरीराला अधीक उर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे या पदार्थाचे सेवन केल्यावर तुम्हाला थकवा किंवा आळस येऊ शकतो. त्यामुळे पॅनकेकचे सेवन आहारात जरा जपूनच करा.