कोरना व्हायरस (Coronavirus) म्हणजेच सीओव्हीआयडी-19 (COVID-19) अवघ्या जगावर संकट बनून राहिला आहे. जगभरातील सर्व देशांतील सरकारे जनतेला काळजी घेण्यास सूचवत आहेत. भारतातही आणि महाराष्ट्रातही जनतेला हाच सल्ला दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना वारंवार हात स्वच्छ करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे हात धुण्यासाठी सॅनिटायजर (Sanitizer) आणि साबण (Soap) यांपैकी अधिक योग्य काय असा सवाल विचारला जात आहे.
- अनेक तज्ज्ञांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलेले मत असे की, सॅनिटायझर आणि साबन हे दोन्हीही हात स्वच्छ करण्यासाठी तेवढेचे प्रभावी असतात. अर्थात व्हायरस रोखण्याची दोन्हीही गॅरेंटी देत नाहीत. पण, तुलनेत सॅनिटायझर आणि साबण बऱ्याच प्रमाणात निर्जंतुकीकरण करतात.
- असे म्हटले जाते की लोक प्रत्येक अडिच (2.5) मिनिटांनी आपल्या चेहऱ्याला हात लावतात. त्यामुळे जर आपल्या हाताला व्हायरसचे संक्रमण झाले त्याद्वारे चेहऱ्याला हात लागून शरीरालाही बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे हात वारंवार धुणे आवश्यक आहे.
- केवळ पाण्याने हात धुने योग्य नाही. कारण पाणी हे व्हायरसबाधित असू शकते. त्यामुळे साबणाने हात धुणे केव्हाही चांगले. सॅनिटायझरही उपयुक्त असते. काही तज्ज्ञ दावा करतात की, साबण हा व्हायरसविरोधात लढण्यासाठी अधिक सक्षम असतो. (हेही वाचा, Coronavirus रोखण्यासाठी वारंवार वापरताय सॅनिटायझर? 'या' गोष्टी नक्की लक्षात घ्या)
खरे तर हात धुण्यासाठी साबण योग्य की सॅनिटायझर याचे समर्पक उत्तर दोन्हीही योग्य असेच आहे. एकमेकांच्या तुलनेत कोणीही कमी नाही. थोड्याफार फरकाने दोन्हीतील गुणधर्म सारखेच असतात. फरक इतकाच की सॅनिटायजर हे द्रव रुपात असते. तर, साबण घनरुपात असतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसला COVID-19 हे नाव दिले आहे. हा एक व्याप्त सुरुवातील साथीचा रोग असे त्याचे वर्गिकरन केले आहे. या आजारावर जगभरात कोणताही उपाय अद्याप सापडला नाही. त्यामुळे सध्या तरी स्वच्छता हाच एकमेव उपाय या रोगावर असल्याचे तज्ज्ञ सांगतात.