Aloo-Baingan (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपल्या देशात फळे आणि भाज्यांची कमतरता नाही. भारतामध्ये अनेक ठिकाणी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी रोज वेगवेगळ्या भाज्या केल्या जातात. यातील काही भाज्या खूप कॉमन आहेत ज्या प्रत्येक घरात हमखास केल्याच जातात आणि आवडीने खाल्ल्याही जातात. यातीलच एक नाव म्हणजे- वांगी-बटाटा भाजी (Aloo-Baingan). भारतामध्ये ही भाजी लोकप्रिय असून ती बाराही महिने खाल्ली जाते. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगातील सर्वात वाईट पदार्थांमध्ये (World’s Worst-Rated Foods) या भाजीचा समावेश करण्यात आला आहे.

जगातील 100 सर्वात वाईट रेट केलेल्या खाद्यपदार्थांच्या यादीत फक्त एक भारतीय डिश समाविष्ट आहे आणि ती म्हणजे ‘आलू बैंगन’. TasteAtlas नावाच्या वेबसाइटने जगातील 100 सर्वात वाईट पदार्थांची यादी तयार केली आहे, ज्यामध्ये बटाटा आणि वांगी भाजीला 60 व्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. वेबसाइट असेही नमूद केले आहे की, ही भाजी उत्तर भारतातील एक स्वादिष्ट, लोकप्रिय लंच आयटम असून, तो सर्रास खाल्ला जातो. मात्र, या यादीत त्याला 5 पैकी केवळ 2.7 रेटिंग मिळाले आहे.

ही यादी पाहून जगभरात फिरणाऱ्या पर्यटकांनी कोणत्या देशात जाताना कोणती डिश खावी आणि कोणती डिश टाळावी याचा अंदाज बांधता येतो. आपल्या देशात लोक बटाटे, वांगी, कांदा, टोमॅटो आणि काही मसाल्यांचा वापर करून सुकी अथवा पातळ भाजी बनवतात. बर्‍याच लोकांना ते आवडते, परंतु जागतिक स्तरावर ही भाजी नाकारण्यात आली आहे. दुसरीकडे, सोशल मिडियावर अनेक भारतीय या रँकिंगशी असहमत असल्याचे दिसत आहेत. (हेही वाचा: Pani Puri Cake: महिलेने बनवला पाणीपुरी केक; संतप्त नेटिझन्स म्हणाले, 'देव कधीच माफ करणार नाही')

या यादीतील सर्वात वाईट रेटिंग असलेल्या डिशबद्दल बोलायचे झाले तर, ती आहे 'हकार्ल'. ही डिश शार्कचे मांस सडवून बनवला जाते. हा मसालेदार पदार्थ आइसलँडमध्ये राहणाऱ्या लोकांना खूप आवडतो. मात्र याच्या तिखट चवीमुळे त्याला सर्वात वाईट खाद्यपदार्थांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.