
Ganesh Jayanti 2023: आजपासून जानेवारीचा चौथा आठवडा सुरू झाला आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीपासून हा सप्ताह सुरू झाला असून, त्याची समाप्ती शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला होईल. गणेश जयंती, वसंत पंचमी, रथ सप्तमी, महानंद नवमी यासारखे मोठे उपवास उत्सव या आठवड्यात साजरे केले जात आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात येणाऱ्या या व्रताची तारीख आणि महत्त्व जाणून घेऊयात...(हेही वाचा- रथ सप्तमी च्या दिवशी सूर्याची पूजा केल्यास होतील 'हे' आरोग्यदायी फायदे)
गणेश जयंती -
भगवान गणेशाचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला झाला. त्यामुळे हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. यावेळी गणेश जयंती 25 जानेवारीला येत आहे. या दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्याबरोबरच व्रत ठेवण्याचाही नियम आहे. या चतुर्थीला विनायक गणेश चतुर्थी असेही म्हणतात. (हेही वाचा - Republic Day 2023 Maharashtra Tableau: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथातून होणार साडेतीन शक्तिपिठांचे दर्शन, जाणून घ्या सविस्तर)
वसंत पंचमी -
दरवर्षी वसंत पंचमी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी माता सरस्वतीचे दर्शन झाले असे मानले जाते. यामुळे या दिवशी माता सरस्वतीची विधिवत पूजा केली जाते. यंदा सरस्वती पूजा गुरूवारी म्हणजे 26 जानेवारी येत आहे.
रथ सप्तमी 2023 -
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथ सप्तमी व्रत केले जाते. या दिवशी सूर्याची पूजा करण्याचा नियम आहे. असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाची पूजा पद्धतशीरपणे केल्याने सुख-समृद्धी मिळते आणि मुलाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते. या सप्तमीला सूर्य सप्तमी, रथ आरोग्य सप्तमी, सूर्य रथ सप्तमी इत्यादी नावांनीही ओळखले जाते.
महानंद नवमी -
गुप्त नवरात्रीची नवमी महानंद नवमी तिथी म्हणून ओळखली जाते. या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून व्रत केल्यास शुभ फळ मिळते. ज्यामुळे माता प्रसन्न होते आणि आर्थिक स्थितीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते.