Singles Awareness Day 2022: सिंगल्स अवेअरनेस डे ची तारीख आणि इतिहास, जाणून घ्या

लव्हबर्ड्स आणि जोडप्यांसाठीचा प्रेमाचा आठवडा संपला आहे. आता सिंगल्स, आनंद साजरा करा! व्हॅलेंटाईन डे च्या दुसऱ्या दिवशी सिंगल्स अवेअरनेस म्हणून साजरा केला जातो, ज्याला सिंगल्स अॅप्रिसिएशन डे असेही म्हणतात. मंगळवारी, 15 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे, जो 'आनंदी-एकल जीवनशैली' या संकल्पनेवर आधारित आहे. लोकप्रिय गैरसमजांच्या विरुद्ध, सिंगल्स अवेअरनेस डे हा सिंगल असुन समाधानी आहात हे जगाला सांगण्याची संधी आहे. जरी सिंगल्सला भेटवस्तू मिळत नसली तरीही ते समाधानी जीवन जगू शकतात. प्रेमाची इतर रूपे ओळखण्यासाठी देखील हा एक चांगला दिवस आहे, उदाहरणार्थ, कुटुंब आणि मित्रांमधील प्रेम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे.

2001 च्या सुमारास, डस्टिन बार्न्सने त्याच्या ग्रुपसाठी एक दिवस तयार करण्याचा निर्णय घेतला आणि व्हॅलेंटाईन डेला विरोध केला ज्यांच्याकडे कोणी खास नाही अशा प्रत्येकासाठी आणखी एक दिवस जोडला गेला. सिंगल्स अवेअरनेस हा दिवस सांगतो की तुम्हाला एकाकीपणाच्या दु:खात बुडून जाण्याची गरज नाही, तर आवडीच्या गोष्टीत गुंतून वेळेचा आनंद घ्या. परंतु सिंगल्स अवेअरनेस डे कसा पाळावा? जाणून घ्या.

सिंगल्स अवेअरनेस 2022 साठी काही खास कल्पना

1. एकटे मूव्ही डेटवर जा, तुमचा सेल फोन बाजूला ठेवून निसर्गाशी कनेक्ट व्हा आणि एक चांगले पुस्तक वाचून जीवनाचा आनंद घ्या.

2. तुमच्या जुन्या मित्रांना भेटा आणि रीयुनियन लंच किंवा बोर्ड गेमची योजना करा.

3. मॅनी-पॅडीपासून ते फेशियलपर्यंत सुखदायक स्पा आणि मसाजचा आनंद घ्या.

4.एक डायरी घ्या. आयुष्यासाठी तुमची बकेट लिस्ट खाली लिहा आणि त्यासाठी मॅनिफेस्ट करा.

5. सेल्फ लव ही समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे, त्यामुळे स्वतःला वेळ द्या आणि सिंगल असणं एन्जॉय करा.