
Human Rights Day 2022 Messages: जागतिक मानवाधिकार दिन दरवर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 1948 मध्ये सार्वत्रिक मानवाधिकार घोषणा (UDHR) स्वीकारली. 10 डिसेंबर 1950 रोजी मानवी हक्क दिनाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिन साजरा केला जातो. या वर्षी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन 2022 ची थीम 'सर्वांसाठी सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय' आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त लोक एकमेकांना शुभेच्छा देतात.
जर तुम्हालाही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर आम्ही तुमच्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे Wishes, Wallpapers, Whatsapp Status, Images, Quotes घेऊन आलो आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रियजनांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा -Human Rights Day 2022: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाची तारीख, इतिहास आणि महत्त्व, जाणून घ्या)
मानवी हक्क दिनाचा प्रसंग आपल्याला आठवण करून देतो
आपण सर्व समान हक्क घेऊन जन्माला आलो आहोत
आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.
या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

गरीब, श्रीमंत, लहान, मोठे, असो हिंदू व मुसलमान;
सर्वाना मिळो अधिकार, हीच आमची इच्छा!
मानवी हक्क दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

एकताचे बल दाखवूया अधिकारांची रक्षा करूया,
सगळ्यांना देऊ ज्ञान मानावाधीकाराने मान.
मानवी हक्क दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

आपण कोणत्याही अन्यायाशी अस्वस्थ होऊ नका,
मानवी हक्क आयोग तुमच्यासाठी आहे हे विसरू नका.
मानवी हक्क दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मानवी हक्क दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

मानवी हक्क प्रत्येकासाठी आवश्यक आहेत, हा एक प्रकारचा नैसर्गिक अधिकार आहे जो प्रत्येकाला मिळायला हवा. म्हणूनच आपण फक्त आपल्या हक्कांसाठीच नाही तर इतरांच्या हक्कांसाठीही आवाज उठवला पाहिजे. जगात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती समान आहे आणि वंश, रंग, भाषा, धर्म आणि लिंग यानुसार भेदभाव केला जाऊ नये. दरवर्षी मानवी हक्क दिन नवीन थीमसह साजरा केला जातो, या वर्षी दिवसाची थीम "सर्वांसाठी सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय" आहे.