
Savitribai Phule Smruti Din 2023 Images: भारतीय समाजसुधारक, मुलींना शिक्षणाची कवाडं खुली करून देणार्यांपैकी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले (Savitribai Phule ) यांचा आज (10 मार्च) स्मृतिदिन आहे. पती ज्योतिबा फुले यांच्यासोबत सुरूवातीला स्वतः शिक्षणाचे धडे गिरवून नंतर समाजाला शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अमुल्य आहेत. आज त्यांच्यामुळे महाराष्ट्रासह देशात अनेक मुली शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या आहेत. मग अशा या स्त्रीवादाची जननी असलेल्या सावित्रीबाईंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही खास मराठमोळी WhatsApp Status, Facebook Messages सोशल मिडीयात शेअर करून आजच्या दिवशी त्यांच्या स्मृतींना उजाळा द्या.
1840 साली ज्योतिबा फुले यांच्यासोबत विवाहबद्ध झालेल्या सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्याला लग्नानंतर पूर्ण कलाटणी मिळाली. सावित्रीबाईंना सुरूवातीला ज्योतिबा फुलेंनी शिक्षण दिले. नंतर शिक्षण प्रसाराची मोहिम हाती घेतली. सावित्रीबाई या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या. पण समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना शिक्षण उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रवास खूप खडतर होता. आपल्याच लोकांकडून त्यांना त्रास देण्यात आला. अंगावर शेण फेकण्यात आले. पण त्या डगमगल्या नाही. सत्यशोधक समाज संस्थेद्वारा त्यांनी आपलं सामाजिक काम सुरूच ठेवलं. नक्की वाचा: Savitribai Phule Death Anniversary: स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका, जाणून घ्या सावित्रीबाई फुले यांच्या समाज कार्याविषयी .
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी अभिवादन





शिक्षणप्रसारासोबतच त्यांनी अनिष्ट रूढी, रिती-रिवाज यांच्याविरूद्ध देखील आवाज उठवला. सती प्रथेला कडाडून विरोध केला. त्यांनी पतीच्या सोबतीने विधवा आणि वंचित मुलांसाठी राहण्याची सोय करण्यास सुरूवात केली.
प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाईंना मृत्यूने गाठलं. पुण्यात प्लेगची साथ असताना लोकांच्या मदतीला धावून गेलेल्या सावित्रीबाईंनाही या आजाराची लागण झाली आणि त्यामध्ये 10 मार्च 1897 मध्ये त्यांचं निधन झालं.