रमजान (Ramadan) हा इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना आहे, जो सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात रोजा ठेवले जातात आणि अल्लाची प्रार्थना केली जाते. या महिन्यात मुस्लीम बांधवांसाठी ज्याप्रमाणे प्रार्थनेला विशेष महत्व आहे, तसेच महत्व रोजा ठेवण्यालाही आहे. उपवासाला अरबीमध्ये 'सौम' असे म्हणतात, म्हणून या महिन्याला अरबीमध्ये माह-ए-सयाम देखील म्हणतात. उपवासाच्या दिवशी, सूर्योदयाच्या अगोदर काही खातात, ज्याला सेहरी (Sehri) म्हणतात. त्यानंतर दिवसभर कडक उपवास व रात्री सूर्यास्ता नंतर उपवास सोडतात, त्यास इफ्तार (Iftar) असे म्हणतात.
सध्या देशावर कोरोना विषाणूचे संकट आहे, सामुदायिक प्रार्थना बंद आहेत. लोक आपापल्या घरीच कुराणचे पठन, रोजा ठेवणे, प्रार्थना करणे अशी धार्मिक कृत्ये करत आहेत. तर अशा या पवित्र महिन्याच्या काळात चला जाणून घेऊया राज्यातील महत्वाच्या शहरांमधील उद्या म्हणजे, 18 मेच्या सेहरी व इफ्तारच्या वेळा.
> मुंबई -
सेहरी वेळ - 04:42
इफ्तार वेळ - 07:08
> पुणे -
सेहरी वेळ - 04:40
इफ्तार वेळ - 07:06
> कोल्हापूर -
सेहरी वेळ - 04:42
इफ्तार वेळ - 07:02
> औरंगाबाद -
सेहरी वेळ - 04:31
इफ्तार वेळ - 07:03
> नागपूर -
सेहरी वेळ - 04:13
इफ्तार वेळ - 06:49
> नाशिक -
सेहरी वेळ - 04:37
इफ्तार वेळ - 07:08
दरम्यान, या महिन्यातच हजरत मुहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येचे फळ प्राप्त झाले. अर्थात त्यांना अल्लाहचे दर्शन झाले, अशी मान्यता आहे. माणसाला त्याच्या चांगल्या- वाईट गोष्टींची, पाप-पुण्याची जाणीव करून देणार्या या महिन्यात उपवास कराचे असतात. उपवास म्हणजे आत्म्याचे, आचारविचारांचे शुद्धीकरण होय. या महिन्यातील दानालाही विशेष महत्व आहे. (हेही वाचा: यंदा मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार पण..! बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने घेतला 'हा' निर्णय)
रमजानचा महिना हा संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना आहे. या काळात मुस्लीम बांधव सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून दूर राहतात. नमाज, रोजे, प्रार्थना, कुराणचे वाचन अशा पवित्र वातावरणात हा महिना व्यतीत केला जातो.