PU LA Deshpande 101st Anniversary: पु. ल. देशपांडे, मराठी साहित्य विश्वातील एक बहुरंगी व्यक्तिमत्त्व; 101 व्या जयंतीनिमित्त जाणून घ्या खास गोष्टी

पुलं त्यांच्या लिखानामुळे घराघरात पोहोचले. परंतू, आपल्या कथाकथनाच्या माध्यमातून ते अधिक मोठ्या प्रमाणात घरोघरी पोहोचले. 'तुम्ही पुणेकर, नाशिकर की मुंबईकर' ही कथा ऐकावी तर पुलं यांच्या तोंडूनच.

PU LA Deshpande | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (Purushottam Laxman Deshpande) अर्थातच पु. ल. देशपांडे (PU LA Deshpande) मराठी साहित्य, संस्कृती विश्वात (Marathi Literature) केवळ आदरानेच नव्हे तर आठवणीने घेतले जाणारे नाव. प्र. के. अत्रे (Pralhad Keshav Atre) यांच्याप्रमाणेच एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे होय. 8 नोव्हेंबर 1919 मध्ये जन्मलेल्या पु.लं. देशपांडे यांचे मागच्याच वर्षी जन्मशताब्दी वर्ष साजरे झाले. त्याच वर्षी त्यांच्यावर 'भाई' नावाचा एक सिनेमाही आला. पुलंना प्रेमाने जरी 'भाई' म्हटले जाई. तरी, साहित्या, संगित अभिनय अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या कामातून त्यांची 'भाईगिरी' जोरदार चालत असे. यंदा पुल देशपांडे यांची 101 वी जयंती (PU LA Deshpande Birth Anniversary) आहे.

'भाई' या आदरार्थी नावाने उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले 'पुलं' म्हणजे एक मिश्किल व्यक्तमत्व. त्यांचे चाहते त्यांना मराठी साहित्यातील विनोदाचा बादशाह असेही म्हणतात. त्यांच्या टीकाकारांचा मात्र त्याच्यावर मोठा आक्षेप असतो. कारण पुलं यांचे साहित्य आणि त्यातील विनोद म्हणजे एक तत्कालीन परिस्थितीवर केलेली कोटी असते. त्यामुळे पुलं यांचा विनोद हसवणारा असला तरी टिकावू नाही असा त्यांचा आक्षेप. परंतू असे असले तरी, पुलंच्या लिखानाचे महाराष्ट्रात आणि देश विदेशातही जोरदार चाहते आढळतात.

पुलं त्यांच्या लिखानामुळे घराघरात पोहोचले. परंतू, आपल्या कथाकथनाच्या माध्यमातून ते अधिक मोठ्या प्रमाणात घरोघरी पोहोचले. 'तुम्ही पुणेकर, नाशिकर की मुंबईकर' ही कथा ऐकावी तर पुलं यांच्या तोंडूनच. इतकेच कशाला 'म्हैस', 'दादू', 'नारायण', 'अण्णू गोगट्या', 'अंतू बर्वा' यांसारख्या एक ना अनेक पात्रांना पु. लं. देशपांडे यांनी आपल्या कथेतून जन्म दिला आणि महाराष्ट्रातील घराघरात आणि मनामनातही पोहोचवले. (हेही वाचा, Purushottam Laxman Deshpande's 101st Birthday Google Doodle: पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची 101 वी जयंती, जगप्रसीद्ध सर्ज इंजिनवरील गूगल डूडल पाहिलेत का?)

पु. लं. देशपांडे हे तसे कोकणातले. त्यामुळे त्यांच्या साहित्यात कोकणातील वर्ण येणे स्वाभाविकच होते. परंतू, असे असले तरी कोकणातले असूनही त्यांची लेखणी विशिष्ठ प्रदेशापुरती कधीच मर्यादित राहिली नाही. त्यांनी विविध क्षेत्रात भरीव लिखाण केले. यात प्रामुख्याने विनोदी कथा, नाटकं, गाणी, कविता यांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला पु. लं देशपांडे यांनी चित्रपट, आणि अभिनय यांसोबतच संगित क्षेत्रातही चांगली कामगिरी केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनामनात त्यांचे लिखान एक मानाचे स्थान मिळवून बसले आहे ते कायमचेच

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now