Bank Holiday | (Photo Credits: PTI)

November 2019 Bank Holidays in Maharashtra:  दिवाळीची धामधूम संपल्यानंतर आता नव्या महिन्याची सुरूवात होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात सणांची रेलचेल मोजकीच राहणार असल्याने दुसरा आणि चौथा शनिवार म्हणजे 9 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर दिवशी बॅंकांचे व्यवहार ठप्प राहणार आहेत. तर 12 नोव्हेंबर दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने बॅंक हॉलिडे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2019 मध्ये आठवड्याच्या मधल्या वारांमध्ये बॅंक बंद राहण्याची वेळ केवळ एकच दिवस राहणार आहे. सध्या सणाची रेलचेल असल्याने अनेकजण मोठे आर्थिक व्यवहार करतात. अशावेळेस बॅंक हॉलिडेमुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून यंदा नोव्हेंबर महिन्यात नेमक्या कोणत्या दिवशी बॅंक बंद राहणार आहे हे जाणून घ्या आणि त्यानुसार तुमचं नोव्हेंबर महिन्याचं आर्थिक प्लॅनिंग करा.

आजकाल ऑनलाईन पेमेंट सुविधेमुळे अनेकदा अवघ्या काही मिनिटांत व्यवहार करणं शक्य आहे. पण तुम्हांला थेट बॅंकेमध्ये जाऊनच व्यवहार करणं गरजेचे असेल तर तुम्हांला नोव्हेंबर महिन्यातील या बॅंक हॉलिडे लिस्टकडे लक्ष देणं गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील नोव्हेंबर 2019 मधील बॅंक हॉलिडे

9 नोव्हेंबर, दुसरा शनिवार - बॅंक बंद

10 नोव्हेंबर, रविवार आणि ईद -ए- मिलाद - बॅंक बंद

12 नोव्हेंबर, गुरु नानक जयंती - बॅंक हॉलिडे

23 नोव्हेंबर, चौथा शनिवार - बॅंक बंद

24 नोव्हेंबर, रविवार - बॅंक बंद

नोव्हेंबर महिन्यात 8 नोव्हेंबरला देवउठनी एकादशी, 9 नोव्हेंबरला तुळशी विवाहारंभ, 12 नोव्हेंबरला गुरूनानक जयंती, 14 नोव्हेंबरला बालदिन 27 नोव्हेंवरला देव दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे बॅंक हॉलिडे सोबत सुट्ट्यांचं प्लॅनिंग करताना या दिवसांचं भान नक्की ठेवा.