Happy New Year 2020 Advance Wishes: नववर्षाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Images, Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून देऊन करा नुतन वर्षाचे स्वागत जल्लोषात

WhatsApp Status, Images, Facebook च्या माध्यमातून नवीन वर्षाच्या अॅडव्हान्स शुभेच्छा देण्यासाठी काही हटके शुभेच्छापत्रं..

New Year Wishes In Advance (Photo Credits: File)

Happy New Year Wishes: नवीन वर्ष अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेले असताना सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. नवीन वर्ष हे नवं चैतन्य, नवा उत्साह, नवा आनंद आपल्या सोबत घेऊन येतो. त्यामुळे जुन्या वर्षाच्या वाईट आठवणी मागे ठेवून आपण नवीन वर्षाचे स्वागत करतो. यंदाही हाच उत्साह कायम ठेवून सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे. या वातावरणात आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत, आपल्या कुटूंबासोबत नववर्षाचे स्वागत करणे, नववर्ष साजरे करणे, एकमेकांना शुभेच्छा यांसारख्या अनेक गोष्टी आपल्या या दिवसानिमित्त करतो.

आता शुभेच्छा देणे आले म्हणजे मेसेजेस आले थोडक्यात सोशल मिडिया आला. WhatsApp Status, Images, Facebook च्या माध्यमातून नवीन वर्षाच्या अॅडव्हान्स शुभेच्छा देण्यासाठी काही हटके शुभेच्छापत्रं..

1) सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया

नवीन वर्षा नवीन संकल्प करुन नववर्षाचे स्वागत करुया

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

2) तुमच्या डोळ्यात जी स्वप्न सजलेली आहे

तुमच्या हृ़द्यात ज्या इच्छा दडलेल्या आहे

नववर्षात पूर्ण होवो या सा-या गोष्टी

हेच आमचे देवाकडे मागणे आहे

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

New Year Wishes In Advance (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- New Year 2020 Dating Tips: नवीन वर्षात कुणाला डेट करायचे असेल तर चुकूनही दुर्लक्षित करु नका या '5' गोष्टी

3) पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवी आशा

नवी स्वप्ने, नवी क्षितिजे सोबत माझ्या नववर्षाच्या शुभेच्छा

हॅप्पी न्यू ईयर!

New Year Wishes In Advance (Photo Credits: File)

4) सरते वर्ष विसरून जावे नववर्षाचे स्वागत करावे

प्रार्थना आहे आमची देवाकडे, जे जे तुमच्या मनात आहे ते ते सारे पूर्ण व्हावे

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

New Year Wishes In Advance (Photo Credits: File)

5) नवीन वर्षात संकल्प करुया साधा, सरळ आणि सोप्पा

दुस-याच्या सुखासाठी मोकळा करुया हृद्याचा एक छोटासा कप्पा

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

New Year Wishes In Advance (Photo Credits: File)

त्यामुळे जराही वेळ न दवडता आपल्या जवळच्या लोकांच्या मोबाईलचे इनबॉक्स फुल्ल होण्याआधी अथवा तुमच्या आधी कोणी तुमच्या खास व्यक्तीला नववर्षाच्या शुभेच्छा देऊ नये म्हणून त्वरित या शुभेच्छा पत्रे पाठवा.