मराठी भाषा गौरव दिन निबंध: शालेय निबंध साठी 'मराठी भाषा गौरव दिन' विषयावर उपयुक्त मुद्दे

27 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा होणारा 'मराठी भाषा गौरव दिन' आणि त्यानिमित्त निबंध लेखनासाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे मुद्दे या लेखात देण्यात आले आहेत. कवी कुसुमाग्रज यांचा वारसा आणि मराठी भाषेला मिळालेला 'अभिजात' दर्जा या पार्श्वभूमीवर हा दिवस यंदा अधिक उत्साहात साजरा होत आहे.

मराठी भाषा गौरव दिन निबंध

आज 27 फेब्रुवारी 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभरातील मराठी भाषिक 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करत आहेत. ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच 'कुसुमाग्रज' यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यंदाचे वर्ष विशेष आहे, कारण मराठी भाषेला 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळाल्यानंतरचा हा दुसरा मोठा सोहळा आहे. निबंध स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि मराठी प्रेमींसाठी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करणारे काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत.

निबंधासाठी प्रमुख मुद्दे आणि रचना

एक चांगला निबंध लिहिताना खालील मुद्द्यांचा समावेश करणे परिणामकारक ठरते:

१. प्रस्तावना: मराठी भाषेचे प्राचीनत्व आणि 'अमृतातेही पैजा जिंके' अशा शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी केलेले तिचे कौतुक.

२. कुसुमाग्रजांचे योगदान: कुसुमाग्रजांच्या साहित्याने मराठीला कशी नवी उंची दिली आणि त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस का साजरा होतो, याची माहिती.

३. अभिजात दर्जा: मराठी भाषेला मिळालेल्या ऐतिहासिक 'अभिजात' दर्जाचे महत्त्व आणि त्याचे भाषेच्या संवर्धनासाठी होणारे फायदे.

४. आजची स्थिती: इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या युगात मराठीचा वाढता वापर (उदा. गुगल, एआय मधील मराठी).

५. समारोप: आपली भाषा टिकवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत, यावर भाष्य.

कुसुमाग्रज: मराठी साहित्यातील ध्रुवताारा

मराठी भाषा गौरव दिन माहिती- वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. त्यांच्या 'विशाखा' या काव्यसंग्रहाने स्वातंत्र्यलढ्यात मोठी प्रेरणा दिली, तर 'नटसम्राट' या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. 1987 मध्ये त्यांना साहित्यातील सर्वोच्च 'ज्ञानपीठ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर, 2013 पासून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित करण्यात आला.

2026 मधील विशेष उपक्रम

यंदा राज्य सरकारने 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त विविध पुरस्कारांचे वाटप 'गेटवे ऑफ इंडिया' येथे एका भव्य सोहळ्यात करण्याचे नियोजित केले आहे. तसेच, नाशिकमधील शिरवाडे येथे 'कवितांचे गाव' आणि रत्नागिरीत 'पुस्तकांचे गाव' यांसारख्या अभिनव उपक्रमांचे उद्घाटनही या दिवशी होत आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'मराठी स्वाक्षरी मोहीम' आणि 'ग्रंथ दिंडी'चे आयोजन करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement