Happy Propose Day 2020 Wishes: प्रपोज डे च्या निमित्त मराठी रोमँटिक शुभेच्छा, Messages, Greetings, WhatsApp Status, GIFs, Images पाठवून तुमच्या प्रिय व्यक्तीकडे द्या प्रेमाची कबुली
प्रपोज डे च्या निमित्त हे मराठी रोमँटिक शुभेच्छा Messages, Greetings, WhatsApp Status, GIFs, Images पाठवून तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनला सरप्राईज देऊ शकाल.
प्रेमाचा आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) आज (7 फेब्रुवारी) पासून सुरु झाला आहे. उद्या या वीक मधील सर्वात खास दिवस म्हणजेच प्रपोज डे (Propose Day) प्रेमीयुगुलांकडून साजरा केला जाणार आहे. खरं तर आपण अनेकदा ऐकतो कि प्रेम ही एक अव्यक्त भावना आहे, मात्र जर का आपल्यावरील प्रेमाची कबुली देताना कोणी सुंदर ओळी रचून किंवा अगदीच शक्य न झाल्यास ओळी म्ह्णून प्रपोज केलं तर कोणाला नाही आवडणार? जर का यंदाच्या प्रपोज दिनाच्या निमित्त तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही तिच्या/ त्याच्यावर किती प्रेम करता हे सांगू इच्छित असाल तर तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही एक खास लेख घेऊन आलो आहोत. मराठमोळ्या अंदाजात सुंदर शब्दाची सांगड घातलेले हे मॅसेजेस तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवून तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता. आता तुमच्या आवडीनुसार उद्याचा प्लॅन कसा करायचा हे तुम्ही ठरवालच पण प्रपोज करताना नेमका काय मॅसेज द्यावा ही चिंता आम्ही मिटवणार आहोत. प्रपोज डे च्या निमित्त हे मराठी रोमँटिक शुभेच्छा Messages, Greetings, WhatsApp Status, GIFs, Images पाठवून तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनला सरप्राईज देऊ शकाल.
हाती हात देशिल का
जन्मभराची साथ देशील का
सांग तू माझी होशील का?
हॅप्पी प्रपोज डे, I Love You
माझ्या प्रेमाच्या स्वप्नांचा चेहरा होशील का
प्रेम माझे स्वीकारून होकार देशील का?
I Love You
तू हो म्हणालीस तर होईल प्रत्येक क्षण खास
आयुष्यभर मिळेल का मला तुझा सहवास
I Love You, हॅप्पी प्रपोज डे
एक होकार हवा
बाकी काही नको
बाकी काही नको
फक्त नाही म्ह्णू नको
- वैभव जोशी
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता हा खेळ सारा,
कायमची माझी होशील का..?
हॅप्पी प्रपोज डे, I Love You
प्रपोज डे GIFs
विचार करा सकाळी सकाळी उठल्यावर जर का तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमचा हा पहिला प्रेमाचा मॅसेज पाहायला मिळाला तर त्याची/ तिची प्रतिक्रिया किती सुंदर असेल, हीच प्रतिक्रिया पाहून मग तुम्ही प्रत्यक्ष सुद्धा प्रेम व्यक्त करू शकाल.