Happy Independence Day 2020: ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. स्वातंत्र्य दिवस हा भारतातील नागरिकांसाठी एक राष्ट्रीय सण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशातील असंख्य हुतात्म्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली आहे. त्यानंतर तब्बल 150 वर्षानंतर भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या क्रांतिकारकाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असतात. मात्र, यावर्षी स्वातंत्र दिनाच्या निमित्त आपल्या परिवाराला, नातेवाईकांना आणि मित्रांना खालील एचडी इमेज पाठवून त्यांचा दिवस आणखी खास बनवता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेऊन, लॉकडाऊनची नियमावली पाळून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमातून सोशल मीडियाद्वारे आत्मनिर्भर भात या घोषणेचा प्रसार करावा, असेही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल मीडिया व डिजिटल मीडियातून ध्वजारोहण सोहळा साजारा करताना देशभक्तीपर गीते, वेबिनार यांचे आयोजन करावे, त्यासोबतच, घरातील बाल्कनीत आणि गच्चीवर जाऊन तिरंगा फडकवावा, असेही आवाहन शासनाकडून करण्यात आले होते. हे देखील वाचा- Sant Dnyaneshwar Jayanti Wishes: संत ज्ञानेश्वर जयंतीच्या शुभेच्छा मराठमोळ्या HD Images, Messages च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून 'माऊलींं'ना करा अभिवादन!

स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-

स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-

 

स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-

स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-

स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-

कोरोनाच्या संकट काळात भारतात अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजिक कार्यक्रम रद्द किंवा राज्य शासनाच्या निर्बंधाखाली पार पाडले गेले आहे. याचपार्श्वभूमीवर भारतासाठी अतिशय महत्वाचा असणारा स्वातंत्र दिनदेखील लॉकडाऊनच्या निर्बंधाचे पालन करून साजरा करण्यात येत आहे. तसेच या स्वातंत्र दिनानिमित्त कोरोना संकटाशी लढणारे योद्धा डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांच्या कार्याचे कौतूक केले जात आहे. क०द