Gita Jayanti 2020 Quotes: भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते. या पूजनीय अशा भगवद गीतेतून मानवाला जीवन जगण्याची मूळ तत्वे कळाली. म्हणूनच याला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. सुमारे 5000 वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला तो मार्गशीर्ष मासातील दिवस होता. म्हणून मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. यंदा हा दिवस 25 डिसेंबर आला असल्याने आज सर्वत्र गीता जयंती साजरी केली जाईल. देशभरातील लोक हा दिवस अगदी भक्तिभावाने साजरा करतात. भगवद गीतेला पूजन त्यातील पाठ वाचून देवीदेवतांचे या दिवशी स्मरण केले जाते.
अशा या मंगलमयी दिनाच्या शुभेच्छा तुम्ही Greetings, WhatsApp Status, Facebook च्या माध्यमातूनही देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला छान शुभेच्छा संदेशांची गरज असेल. तसेच तुम्ही या शुभेच्छा संदेशांच्या माध्यमातून भगवद गीतेतील बोधपूर्ण वाक्य पाठवून एकमेकांना त्याचे महत्त्व पटवून देऊ शकता.
कर्म करत रहा, फळाची चिंता करू नका- श्रीमद भगवत गीता
हेदेखील वाचा- Geeta Jayanti 2020 Date: यंदा गीता जयंती कधी? जाणून घ्या मोक्षदा एकादशी दिवशी साजरं करण्याचं महत्त्व
क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून बसतो- श्रीमद भगवत गीता
आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात आहे, आयुष्य आहे ते फक्त आताच्या क्षणातच- श्रीमद भगवत गीता
पूर्णपणे ईश्वराला समर्पित व्हा, तो परमेश्वर तुम्हाला सर्व पापांतून मुक्त करेल- श्रीमद भगवत गीता
श्रीमद भगवद गीता जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायः प्रत्येक विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे. अशा या श्रीमद भगवत गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!