Children's Day Celebration Ideas: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात बालदिन (Children's Day 2020) म्हणून साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरूंना लहान मुले फार आवडत असतं हेदेखील त्यामागचे एक कारण आहे. 27 मे 1964 साली सर्वांनुमताने 14 नोव्हेंबर हा दिवस बाल दिन म्हणून घोषित करण्यात आला. पंडित जवाहरला नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये झाले. या दिवशी ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जवाहरलाल नेहरू यांच्यावर भाषणे, लहान मुलांसाठी काही शैक्षणिक तर काही मनोरंजक गोष्टी केल्या जातात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे आपल्याला एकत्रितरित्या जमता येणार नाही. मात्र तुम्ही घरातल्या घरात बच्चे कंपनींसाठी काही खास बेत करु शकतात.
बालदिन हा विशेषत: लहान मुलांसाठीचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी लहान मुलांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी करा म्हणजे त्यांचा हा दिवस आनंदात जाईल. त्यात यंदा 14 नोव्हेंबरलाचा दिवाळीचा पहिला दिवस आणि लक्ष्मीपूजन आल्याने त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी काही हटके गोष्टी ट्राय करा.हेदेखील वाचा- Children's Day 2019: बालपण हरवून बसलेल्या आजच्या पिढीला उजळणी करुन देऊया जुन्या पिढीच्या 'या' खेळांची, बघा तुम्हाला आठवतात का?
1. लहान मुलांचे आवडीचे पदार्थ बनवा
तुमच्या घरातील बच्चे कंपनीला जे काही गोड, तिखट वा फास्ट फूड आवडत असतील तर त्यांच्यासाठी जेवणाचा वा स्नॅक्सचा विशेष बेत करा. आपल्या आवडीचे पदार्थ पाहून त्यांचा मूड चांगला राहील.
2. छान भेटवस्तू घ्या
लहान मुलांना शिक्षणाविषयी वा मनोरंजनासंबंधीत काही भेटवस्तू द्या.
3. घरात Shadow Show आयोजन करा
घरात प्रोजेक्टवर हाताच्या साहाय्याने पडदा लावून शॅडो शो करुन त्यांना छान गोष्टी सांगा. दाखवा यात त्यांचे ज्ञान वाढेल अशा गोष्टी तर काही मजेशीर गोष्टी सांगा. हेदेखील पाहा-Children's Day Special Songs: बालदिना निमित्त बच्चे कंपनीसाठी त्यांची आवडती '10' बडबडगीते, नक्की ऐका
4. दिवाळी आणि बालदिनाविषयी माहिती सांगा
दिवाळी सणाविषयी, बालदिनाविषयी छान मार्गदर्शन करा. या दिनाचे आणि दिवाळी विषयी चांगली माहिती मुलांना सांगा.
5. घरात छोट्या पार्टीचे आयोजन करा.
यंदा याच दिवशी लक्ष्मीपूजन असल्यामुळे मोठी पार्टी करता येणार नाही. मात्र लक्ष्मीपूजा आटोपल्यावर मुलांसाठी संगीत, नृत्याचा कार्यक्रम करा. पझल गेम्स, टंग ट्विस्टर, यांसारखे गेम्स खेळा. त्या सोबत आंधळी कोशिंबीर, आईचा रुमाल हरवला, संत्रा लिंबू, पची, यांसारखे तुमच्या काळातल्या खेळांची देखील ओळख करुन द्या.
बालदिनाचा उत्साह बाळगोपाळांमध्ये चांगला राहण्यासाठी अशा काही हटके गोष्टी तुम्ही या दिवशी करु शकता. त्यामुळे मुलांनाही आपण किती स्पेशल आहोत हे जाणवेल. ज्यामुळे त्यांच्या मनात कसले नैराश्य असेल तर ते दूर होईल.