Happy Dhulivandan 2025 Wishes in Marathi (फोटो सौजन्य - File Image)

Happy Dhulivandan 2025 Wishes in Marathi: धुलिवंदन हा होळीच्या उत्सवाचा एक भाग आहे. दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन (Dhulivandan 2025) साजरे केले जाते. यंदा 14 मार्च रोजी धुलिवंदन साजरे करण्यात येणार आहे. या दिवशी रंग खेळण्याची परंपरा आहे. धुलिवंदनाच्या दिवशी लोक एकत्र येऊन एकमेकांना रंग तसेच गुलाल लावतात. रंगांचा हा सण सर्वांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

धुलिवंदनाचा दिवस अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूपचं खास असतो. रंगांचा हा दिवस तुम्ही धुलिवंदनाच्या शुभेच्छा पाठवून आणखी खास करू शकता. आम्ही तुमच्यासाठी धुलिवंदन कोट्स, धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा, धुलिवंदनाचे मराठी शुभेच्छा संदेश, धुलिवंदन व्हाट्सअॅप स्टेटस घेऊन आलो आहोत. तुम्ही हे ग्रीटिंग्ज सोशल मीडियाद्वारे पाठवून या सणाचा आनंद आणखी द्वगुणित करू शकता.

धुलिवंदनाच्या मराठी शुभेच्छा -

रंग गुलालांचे असले तरी,

माणुसकीच्या रंगांनी रंगू दे जीवन!

धुळवडीच्या प्रेमळ शुभेच्छा!

Happy Dhulivandan 2025 Wishes in Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

तुमच्या आयुष्याची पालवी

हिरव्या रंगासारखी ताजी राहो,

आनंद नेहमी पिवळ्या रंगासारखा तेजस्वी राहो!

शुभ धुळवंदन!

Happy Dhulivandan 2025 Wishes in Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

सूर्याच्या दाहकतेवर करूया पाण्याचा शिडकाव

ह्रदयात मिसळूया स्नेह हास्याचा भाव,

होऊ तल्लीन सप्तसुरात,

रंगवू एकमेकांना सप्तरंगात.

धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Dhulivandan 2025 Wishes in Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

गोड धोड खाद्याचा घेऊया आस्वाद,

प्रेम भाव निर्माण करू,

मिटवूया एकमेकातला वाद

खेळूया रंग उधळूया रंग,

तुम्हाला धुळवडीच्या शुभेच्छा!

Happy Dhulivandan 2025 Wishes in Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)

रंगांचे हे नवे वर्ष सुखसमृद्धीचे जावो,

आयुष्यात गोडवा आणि आनंद राहो!

धुळवडीच्या प्रेमळ शुभेच्छा!

Happy Dhulivandan 2025 Wishes in Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

धुलिवंदनाचा सण महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर भारतातील इतर भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याशिवाय, वृंदावन आणि मथुरामध्ये देखील धुलिवंदन मोठ्या उत्साहात पार पडते.