सध्या गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र दिसून येत आहे. पण मात्र अनंत चतुर्दशीसाठी (Anant Chaturdashi) अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तत्पूर्वी गणेश मंडळांना पुलांवरुन 'एकाच वेळी एक मुर्ती' घेऊन जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कारण यापूर्वी मुंबईत झालेल्या पुलांच्या दुर्घटनेप्रकरणी अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर ऐन अनंत चतुर्दशीला मोठे मोठे गणपती पुलांवरुन नेण्यात येतात. त्यादरम्यान नागरिकांची प्रचंड गर्दी सुद्धा होते. यामुळेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पुलावरुन एकाच वेळी एक गणपती नेण्याची पूर्वसूचना देण्यात आली आहे.
मुंबईतील लालबाग-परळ परिसरातून गणपतीच्या मोठ्या मोठ्या मुर्त्यांची मिरवणूक अनंत चतुर्दशीला पाहायला मिळते. या काळात नागरिकांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून त्यासाठी उपाययोजन सुद्धा केल्या जातात. मात्र यंदाच्या वर्षात पूल दुर्घटनेचे प्रकार समोर आल्यानंतर धोकादायक पूल अनंत चतुर्दशी वेळी मोठ्या गणपतीच्या मिरवणुकीदरम्यान बंद करण्यात आले आहेत. तसेच मुंबईतील आता पर्यंत 20 पूलांवरुन हजारो गणेश मंडळ त्यांची जंगी मिरवणुक काढतात. मात्र आता भाविकांना 16 टनांची मर्यादा पाळावी लागणार आहे. याबाबत महाराष्ट्र टाइम्स यांनी अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील कोणते पुल बंद ठेवण्यात आले आहे याची यादी जाहीर केली आहे.(मुंबई: गणेशोत्सव 2019 च्या मिरवणूकांदरम्यान कमजोर पुलांवर नाचणं टाळा; प्रशासनाचं गणेशभक्तांना आवाहन)
पालिकेकडून जाहीर करण्यात आलेली यादी:
- मध्य रेल्वे
1. घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज
2. करीरोड रेल ओव्हर ब्रिज
3. चिंचपोकळी (ऑर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज
4. भायखळा रेल ओव्हर ब्रिज
- पश्चिम रेल्वे
5. मारिन लाइन्स रेल ओव्हर ब्रिज
6. ग्रॅण्ट रोड - फेरर रेल ओव्हर ब्रिज
7. सँडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये)
8. फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये)
9. केनडी रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये)
10. फॉकलंड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि मुंबई सेंट्रलच्या मध्ये)
11. बेलासीस, मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ
12. महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज
13. प्रभादेवी-कॅरोल रेल ओव्हर ब्रिज
14. दादर टिळक रेल ओव्हर ब्रिज
15. वीर सावरकर रेल ओव्हर ब्रिज (गोरेगाव आणि मालाडच्या मध्ये)
16. सुधीर फडके रेल ओव्हर ब्रिज, बोरिवली
17. दहिसर रेल ओव्हर ब्रिज
18. मीलन रेल ओव्हर ब्रिज, सांताक्रूझ
19. विलेपार्ले रेल ओव्हर ब्रिज
20. गोखले रेल ओव्हर ब्रिज, अंधेरी
- मुंबईतील धोकादायक म्हणून जाहीर झालेल्या काही पुलांवरून जाणाऱ्या गणेशमूर्तींची अंदाजित आकडेवारी:
चिंचपोकळी पूल : २५० ते ३०० भव्य गणेशमूर्ती
दादर टिळक पूल : १०००-१५०० छोट्या-मोठ्या गणपती
ग्रॅण्ट रोड पूल : २०० ते २५० भव्य गणेशमूर्ती
यापूर्वीसुद्धा पालिका प्रशासनाकडून गणेशोत्सवादरम्यान काळात तसेच मिरवणूक कार्यक्रमांमध्ये मुंबईतील कामजोर झालेल्या पुलांवर नाचणं गणेशभक्तांनी टाळावे असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. तसेच मुंबईत स्ट्रक्चरल ऑडिट दरम्यान अनेक पूल धोकादायक असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे भविष्यात पूल अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीतून हा निर्णय घेतला असावा असे सांगण्यात आले होते.