गुणपत्रिका देण्याच्या बहाण्याने वृद्धाचा महिलेवर बलात्कार
फोटो सौजन्य - फाइल फोटो

नवी दिल्लीमधील जैतपुर येथे राहणाऱ्या एका वृद्धाने महिलेला गुणपत्रिका देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच पोलिसांना या घटनेबद्दल कळविल्यास जीवे मारुन टाकण्याची धमकी या वृद्धाने महिलेला दिली.

निरंजन (60) असे या वृद्धाचे नाव असून तो दिल्लीमधील फरीदाबाद येथे राहतो. काही दिवसांपूर्वी ही पीडित महिला निरंजनकडे दहावीची हरवलेली गुणपत्रिका पुन्हा बनवण्यास गेली होती. तसेच तिने निरंजनला या कामाचे पैसे ही देऊ केले होते. मात्र खूप दिवस झाले म्हणून ही महिला पुन्हा 21 ऑक्टोंबर रोजी निरंजनकडे गेली. त्यावेळी या नराधमाने तिला थोडा वेळ आपल्या खोलीत बसण्यास सांगितले. तसेच गुणपत्रिका घेऊन येतो सांगण्याच्या बहाण्याने तिला बसलेल्या खोलीत बंद करुन तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेचीबद्दल पीडित महिलेने पोलिसांनकडे जाऊन निरंजनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वेळेचा विलंब न लावता आरोपी निरंजनला अटक करण्यात आली आहे. तर काही दिवसांतच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.